पिकविम्याची वाढीव रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करून ओला दुष्काळ जाहीर करा'
गुंज बुद्रुक येथील ग्रामस्थांसह युवा शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने तहसीलदारांना निवेदन
आधुनिक केसरी न्यूज
कुलदीप पवार
कुंभार पिंपळगाव : घनसावंगी तालुक्यात मागील पाच ते सहा दिवसांपासून पावसाची संततधार सुरूच आहे.या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.नुकसान भरपाईसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी गुंज बुद्रुक येथील ग्रामस्थांसह युवा शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने सोमवारी (ता.१८) रोजी घनसावंगीचे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की,गुंज येथील अनेक शेतकऱ्यांना मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे बहुतांश शेतकरी अनुदानापासून वंचित राहिले आहेत.ई पीक पाहणी सर्वर तांत्रिक कारणामुळे डाऊन होत आहे.शेतात अडचणी येत आहेत.त्यामुळे ई पीक पाहणी होत नाही.तसेच मयत वारसाचे फेरफार,वाटणी पत्र, सामाईक क्षेत्र,व इतर फेरफार होत नाही.प्रशासनाकडून वारंवार टाळाटाळ होत आहे.मागील पाच ते सहा दिवसांपासून सतत पाऊस सुरू आहे.सततच्या पावसामुळे खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.शासनाने तात्काळ पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई देऊन घनसावंगी तालुका ओला दुष्काळ म्हणून जाहीर करावा.तसेच गुंज येथील शेतकऱ्यांच्या खात्यात पिकविम्याची वाढीव रक्कम खात्यात वर्ग करावेत तालुका कृषी अधिकारी यांना निवेदन देऊनही यावर कुठलीही कार्यवाही करण्यात आली नाही.या संपूर्ण मागण्या मान्य न झाल्यास जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा शेवटी देण्यात आला आहे.या निवेदनावर गुंज येथील ग्रामस्थासह युवा शेतकरी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.यावेळी असंख्य शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List