माऊलीच्या ७५० व्या जन्मोत्सवा निमित्ताने जन्मभुमी आपेगावी जय्यत तयारी
आधुनिक केसरी न्यूज
दादासाहेब घोडके
पैठण : संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७५० वा जन्मोत्सव यंदा आपेगाव जन्मभुमीत मोठ्या थाटात साजरा होणारा असल्याने शासनाच्या वतीने सुवर्ण मोहत्सव सप्तशतकोत्तर कार्यक्रमाचे नियोजन निमित्ताने आपेगावी जय्यत तयारी चालु आसुन या सोहळ्यात प्रसिद्ध किर्तनकार यांचे १३ ते२० अॉगस्ट या सप्ताह काळात माऊलीच्या जन्मोत्सव सोहळ्यात मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री तथा मंत्री महोदय आणि शासकीय सनदी सेवक यांच्या वतीने संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरात १६-१७ अॉगस्ट रोजी शासकीय महापुजा होणार असल्याची माहिती संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर अध्यक्ष ह.भ.प ज्ञानेश्वर विष्णू महाराज कोल्हापूरकर यांनी दिली.
दरम्यान या सोहळ्यासाठी तालुक्यातील तसेच राज्यातील माऊली भक्तांना निमंत्रण देवु केले असुन पैठण तालुक्यातील प्रत्येक गावातुन रोज दोन वेळेस भाकरी,पोळी ची माधवगिरी जमा करण्यात येणार असुन सात दिवस रोजच्या अन्नदान व महाप्रसादाची पंगत या जन्मोत्सव सोहळ्याचे अध्यक्ष आमदार विलासबाप्पु भुमरे यांनी केले आहे.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List