भरड धान्यापासून साकारली साईची मुर्ती..!
आधुनिक केसरी न्यूज
शिर्डी : देश-विदेशातील कोट्यवधी साईभक्तांची श्री साईबाबांप्रती अपार श्रद्धा आहे. भक्त आपल्या भावनांना वेगवेगळ्या कला व माध्यमांतून व्यक्त करत असतात. अशाच एक आगळ्यावेगळ्या भक्तीची प्रचिती आज शिर्डीत झााली.
विशाखापट्टणम (आंध्रप्रदेश) येथील रहिवासी व साईभक्त कलाकार श्री मोक्का विजय कुमार यांनी भरड धान्यांपासून साकारलेला श्री साईबाबांचा अत्यंत सुंदर व कलात्मक फोटो आज श्री साईबाबांच्या चरणी अर्पण केला. या छायाचित्रात त्यांनी बाजरी, ज्वारी, तीळ, काळे तीळ यांसारख्या विविध भरड धान्यांचा कुशलतेने वापर करून श्री साईबाबांचे तेजस्वी रूप साकारले आहे.सदर कलाकृती श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गोरक्ष गाडीलकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. यानंतर संस्थानच्या वतीने देणगीदार श्री साईभक्तांचा सत्कार करण्यात आला.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List