बनावट नोटा करणारी टोळी पकडली ८८लाखाचा मुद्देमाल जप्त
आधुनिक केसरी न्यूज
शिर्डी : अहिल्यानगर मध्ये बनावट नोटा बनवून विक्री करणारी टोळी नगर तालुक पोलिसांनी जेरबंद केले आहे. यामध्ये ७ आरोपी पकडण्यात आले असून एक आरोपी फरार आहे कारवाईत ८८ लाख २०हजार सहाशे रुपये मुद्देमाल जप्त केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते यांच्या कामगिरीचे कौतुक जिल्हा पोलीस अधीक्षकांनी केले आहे. २७ जुलै रोजी नगर तालुका पोलीस स्टेशनचे सपोनि प्रल्हाद गिते हे हद्दीत पेट्रोलींग करत असताना माहिती मिळाली की, दोन इसम एक काळ्या रंगाचे महिंद्रा थार गाडीमध्ये फिरत असुन त्यांच्याकडे पाचशे रुपये दराच्या बनावट चलनी नोटा आहेत आणि ते आंबीलवाडी शिवारात प्रत्येक पान टपरीवर देवुन सिगारेट खरेदी करत आहेत.त्यावर सपोनि गिते सो यांनी पथकासह आंबीलवाडी शिवारात जावुन खात्री केल्यावर तेथे दोन संशयीत इसम एक महिंद्रा थार गाडीमध्ये फिरताना दिसले. इसमांना ताब्यात घेवुन चौकशी केली असता त्यांनी त्यांचे नाव १) निखील शिवाजी गांगर्डे वय २७ रा. कुंभळी ता कर्जत २) सोमनाथ माणिक शिंदे वय २५ रा. तपोवन रोड जि. अहिलयानगर असे सांगितले गाडीची झडती घेतील असता त्यांचे कब्जात८० हजार रुपयांच्या पाचशे रुपये दराच्या बनावट चलनी नोटा मिळुन आल्याने त्यांना ताब्यात घेवुन त्यांच्यावर नगर तालुका पोलीस स्टेशन गुरन. ६२८/२०२५ भारतीय न्यास संहिता २०२३ चे कलम १७९, १८०, ३ (५) अन्वये गुन्हा दाखल केला. याबाबत अधिक तपासाअंती आणखी ५ आरोपी छ. संभाजीनगर, बीड जिल्ह्यातून ताब्यात घेण्यात आले तर कारवाई दरम्यान एक आरोपी फरार झाला आहे त्याचा तपास सुरु आहे.
सोमनाथ घार्गे, जिल्हा पोलिस अधीक्षक
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List