दोन वर्षांपूर्वी अपहरण झालेल्या मुलीचा शोध व सुटका

ऑपरेशन मुस्कान अंतर्गत वर्षभरात राहुरी पोलीसांनी लावला एकूण 73 मुलींचा शोध 

दोन वर्षांपूर्वी अपहरण झालेल्या मुलीचा शोध व सुटका

आधुनिक केसरी न्यूज
 
राहुरी : पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर  876/2023 भारतीय दंड विधान कलम 363 , प्रमाणे दिनांक 11/08/2023  रोजी  गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. सदर गुन्हयामध्ये अपहरीत मुलीबाबत काहीएक माहिती उपलब्ध्द नसतांना गुप्त बातमीदाराच्या मदतीने व तांत्रिक तपासाद्वारे तसेच अथक परीश्रम घेवुन गुन्हयातील अपहरीत मुलीचा माग काढुन तिचा शोध घेऊन तीला  राहुरी पोलीस स्टेशनला आणून  सदर पीडितेस  तिचे  नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.  व अपहरण करणारा युवक करण अशोक पवार, वय 23 वर्ष रा. खुडसरगाव तालुका राहुरी  यांस ताब्यात घेऊन पुढील  तपास पोलीस उपनिरीक्षक राजु जाधव , पोलिस कॉन्स्टेबल. गणेश लिपने  हे करत आहेत.
 ऑपरेशन मुस्कान अंतर्गत राहुरी पोलीस स्टेशन हद्दीतील मुलींचा शोध घेऊन  गेल्या वर्षभरात 73 मुलींचा शोध घेऊन त्यांच्या पालकांच्या ताब्यात दिले.
 
सदरची कारवाई अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक श्री. सोमनाथ घार्गे , मा.श्री. सोमनाथ वाकचौरे . ,अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर  , श्री. डॉ.बसवराज शिवपुजे , उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपुर उपविभाग जिल्हा अहिल्यानगर यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली पो.नि.संजय आर.ठेंगे, पोसई राजू जाधव , पोहेकॉ. राहुल यादव, पोकॉ.अशोक शिंदे पोकॉ. गणेश लिपणे पोकॉ. शेषराव कुटे , मपोकॉ. वृषाली कुसळकर, अंजली गुरवे नेमणुक राहुरी पोलीस स्टेशन जि. अहिल्यानगर व पो.ना.संतोष दरेकर, नेमणुक अपर पोलीस अधीक्षक सो श्रीरामपुर जि. अहिल्यानगर मोबाईल सेल यांनी केलेली आहे.
Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

भिगवण येथून २७ वर्षीय तरुण युवक बेपत्ता! भिगवण येथून २७ वर्षीय तरुण युवक बेपत्ता!
आधुनिक केसरी न्यूज निलेश मोरे भिगवण : दि.१ इंदापूर तालुक्यातील भिगवण-स्टेशन येथील शक्ती सुधाकर खडके (वय-२७ वर्षे) हा बुधवार (दि.३०)...
किनवट तालुक्यातील बहूचर्चीत पोद्दार स्कूल आणि रुपेश वाट्टमवार टी.सी प्रकरण अखेर संपुष्टात..!
छावा तर्फे आमदार, खासदार, मंत्री यांच्या राज्यस्तरीय रमी पत्ते, व कुस्ती आखाडा स्पर्धा
आ.डॉ.संजय कुटे यांना मातृ शोक, उर्मिला कुटे यांचे दुःखद निधन
बनावट नोटा करणारी टोळी पकडली ८८लाखाचा मुद्देमाल जप्त 
दोन वर्षांपूर्वी अपहरण झालेल्या मुलीचा शोध व सुटका
लवकरच एसटीचे रिटेल किरकोळ इंधन विक्रीत पदार्पण परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती..!