किनवट तालुक्यातील बहूचर्चीत पोद्दार स्कूल आणि रुपेश वाट्टमवार टी.सी प्रकरण अखेर संपुष्टात..!
पत्रकार लक्ष्मीकांत मुंडे यांच्या मध्यस्थिने तक्रार मागे घेत विनशुल्क टी.सी मिळाल्याने पालक समाधानी...
आधुनिक केसरी न्यूज
लक्ष्मीकांत मुंडे
किनवट : तालुक्यातील बेंदी या ठिकाणी 2019 पासून सुरु झालेल्या ज्ञानज्योती पोद्दार स्कूल ची प्रतिमा आणि प्रतिभा शिक्षणात, क्रीडा क्षेत्रात दिवसेंदिवस उंचावत असतानाच शाळेतील काही ऊनिवा असोत किंवा शाळेच्या मॅनेजमेंट बद्दल तक्रारी यामुळे सदरील शाळा गेल्या काही दिवसापासून चर्चेचा विषय झाली होती. किनवट शहरातील कापड व्यापारी शुभम वट्टमवार यांचा मुलगा कार्तिक वट्टमवार हा या शाळेत तिसऱ्या वर्गात शिकत होता. परंतु पालकांना मात्र त्याच्यात हवी तशी प्रगती दिसत नसल्याने त्यांनी त्याची टी. सी दुसरीकडे टाकण्याचे ठरविले परंतु शाळा प्रशासनाने तिसऱ्या वर्षाची फीस भरण्यास सांगितल्याने वट्टमवार यांनी आधीच अर्धी फीस भरली असे स्पष्ट केले. यासह शाळेतील स्टाफ च्या वागण्याने व बोलण्याने नाराज वट्टमवार यांनी शाळेची तक्रार शिक्षण विभागासह पोलिसात ही केली. याबाबतीत अनेक वर्तमानपत्रात बातम्याही प्रकाशित झाल्या. परंतु शाळेच्या नियमानुसार शाळा स्वतः निर्दोष असल्याचे ठामपणे सांगत होती. याबाबतीत दै. आधुनिक केसरीचे पत्रकार लक्ष्मीकांत मुंडे व आशिष शेळके यांनी डी. 1 ऑगस्ट रोजी वट्टमवार यांना संपर्क साधून त्यांचे म्हणणे जाणून घेऊन शाळेला प्रत्यक्ष भेट देत प्रकरणाची शहानिशा केली असता शाळा प्रशासन यांनी शाळेच्या काही त्रुटी मान्य करत सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
शाळा नियमानुसार किमान का होईना फीस भरून टी सी द्यायला तयार होती आणि वट्टमवार आपल्या भूमिकेवर अडून असताना पत्रकार लक्ष्मीकांत मुंडे यांनी वैयक्तिक दी. 1 ऑगस्ट रोजी शाळा प्रशासन व संचालक मंडळ यांच्याशी संपर्क करून यात मध्यस्तीने मार्ग काढून पालकांच्या व शाळेच्या वादात विद्यार्थ्यांच शैक्षणिक नुकसान न करण्याची विनंती केल्याने व वट्टमवार दांपत्याला सहकार्य करण्याची विनंती केल्याने दी.2 ऑगस्ट रोजी या वादावार अखेर पडदा पडला असून वट्टमवार कुटूंबायांनीही आपली तक्रार मागे घेतली शाळा प्रशासनाने त्यांना शुल्क न घेता आदरपूर्वक टी. सी., बोनाफाईड व प्रवेश निर्गम अशी सर्व कागदपत्रे मुंडे यांच्या समक्ष दिली. या बाबतीत तालुक्यातील पत्रकारांनी केलेल्या सहकार्या बद्दल त्यांचे शुभम वट्टमवार यांनी आभार मानले. यावेळी पोद्दार शाळा प्रशासनाकडून यानंतर पालकांच्या बाबतीत किंवा विद्यार्थ्यांच्या बाबतीत कुठल्याही चुका न करण्याच्या सूचना समस्त पत्रकारांच्या वतीने लक्ष्मीकांत मुंडे यांनी दिल्या.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List