कीर्तन महोत्सव समितीतर्फे जेष्ठ नागरिक विजयकुमार गोखले यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार
आधुनिक केसरी न्यूज
सुधीर गोखले
सांगली : येथील जेष्ठ नागरिक आणि ज्योतिष शास्त्राचे गाढे अभ्यासक श्री विजयकुमार गोखले यांच्या वाढदिवसानिमित्त काशीविश्वेश्वर महाशिवरात्री कीर्तन महोत्सव समितीतर्फे त्यांचा हृदय सत्कार करण्यात आला समितीचे निमंत्रक आणि शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा उपाध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते माधव गाडगीळ यांच्या हस्ते हा छोटेखानी सत्कार सोहळा काशीविश्वेश्वर मंदिराच्या आवारात पार पडला. श्री गोखले हे वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयातील माजी विद्यार्थी आहेत. तसेच कोयना प्रकल्पाच्या चौथ्या टप्प्यातील कामामध्ये त्यांचे योगदान राहिले आहे. मिरजेतील जुन्या शाळांपैकी विद्यामंदिर प्रशाला मिरज च्या उभारणीमधील एक पंडित महादेव शास्त्री गोखले यांचे ते चिरंजीव होत. ज्योतिष शास्त्रातील विशेष अभ्यासासाठी मिरज आणि पंचक्रोशीत त्यांची ख्याती आहे. लोकप्रिय दैनिक आधुनिक केसरी चे सहसंपादक सुधीर गोखले यांचे ते वडील आहेत. आजच्या या सत्कार सोहळ्याला स्टेट बँकेतील निवृत्त अधिकारी कट्टी यांच्या सह जेष्ठ नागरिकांची उपस्थिती होती. यावेळी शिवसेना नेते माधव गाडगीळ यांनी श्री विजय गोखले याना दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List