रेल्वे च्या अपुऱ्या कामाबाबत 'जनसुराज्य' चे समित कदम यांनी घेतली केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट दिले निवेदन
आधुनिक केसरी न्यूज
सुधीर गोखले
सांगली : आणि कोल्हापूर जिल्ह्यातील रेल्वे च्या प्रलंबित कामाबाबत महायुतीचा घटक पक्ष असलेल्या जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेश अध्यक्ष समित कदम यांनी नुकतीच दिल्ली येथे केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली तसेच प्रलंबित कामे त्वरित मार्गी लावण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घ्यावी या व इतर अन्य मागण्यांचे निवेदन त्यांनी यावेळी केंद्रीय मंत्र्यांना दिले. यामध्ये मुख्यतः मिरज हे जंक्शन असूनही अद्याप या रेल्वे स्थानकाचा विकास झाला नाही तर कोल्हापूर वैभववाडी या रेल्वे मार्गासह अनेक दीर्घकालीन प्रलंबित प्रश्नासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक घ्यावी अशी विनंतीही त्यांनी यावेळी केली याप्रसंगी निश्चित पणे आपण लवकरात लवकर बैठक घेऊन सर्व प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन देत सकारात्मकता दाखवली यावेळी जनसुराज्य चे समित कदम यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी संवाद साधला असता ते म्हणाले कि मिरज शहर हे कर्नाटक आणि महाराष्ट्र या राज्यांना जोडणारे महत्वाचे शहर आहे मोठ्या संख्येने दोन्ही राज्यातील नागरिक रेल्वे प्रवास करत असतात. मात्र इतर शहरातील रेल्वे स्थानकांच्या तुलनेमध्ये मिरज रेल्वे स्थानकाचा म्हणावा असा विकास आजअखेर झालेला नाही त्याच प्रमाणे कोल्हापूर वैभववाडी या रेल्वे मार्गाची घोषणा होऊनही बराच कालावधी गेला मात्र अजूनही या विषयावर अधिकारी बोलतही नाहीत यासह इतर प्रश्नासाठी मी दिल्ली येथे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन वरील प्रलंबित प्रश्नाबाबत बैठक घेण्याची निवेदनाद्वारे विनंती केली आहे केंद्रीय मंत्र्यांनीही याबाबत सकारात्मक दाखवली आहे लवकरच बैठक घेण्याचे आश्वासनही त्यांनी दिले आहे'.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List