आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत महात्मा गांधी विद्यालयाचा मयुरेश कोळी याचा डंका ; भूतानमध्ये पटकावले दोन रौप्यपदक

 आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत महात्मा गांधी विद्यालयाचा मयुरेश कोळी याचा डंका ; भूतानमध्ये पटकावले दोन रौप्यपदक

आधुनिक केसरी न्यूज

 सुधीर गोखले 

सांगली : येथील अभिनव समाज सुधार शिक्षण मंडळ संचलित महात्मा गांधी विद्यालयाचा विद्यार्थी मयुरेश राजेंद्र कोळी याने भूतान येथे नुकत्याच पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत काटा आणि कुमिते प्रकारात दोन रौप्यपदके (सिल्व्हर मेडल्स) पटकावत सांगलीचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर उज्ज्वल केले आहे. त्याच्या या गौरवपूर्ण यशामुळे संपूर्ण विद्यालय परिवारात व शहरात आनंदाचे व अभिमानाचे वातावरण आहे.

ही स्पर्धा २३ जुलै २०२५ रोजी भूतानमध्ये मोठ्या दिमाखात पार पडली. विविध देशांतील शेकडो खेळाडूंमध्ये कडवी स्पर्धा असतानाही  मयुरेशने आपल्या कौशल्य, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर दोन्ही प्रकारांत चमकदार कामगिरी करत रौप्यपदके मिळवली. या यशामागे मयुरेशच्या कठोर मेहनतीबरोबरच शाळेतील कुशल प्रशिक्षण, योग्य मार्गदर्शन व संस्थेचे मोलाचे सहकार्य आहे. विशेषतः संस्थेच्या अध्यक्षा मा. डॉ. सौ. जहिदा मुजावर, सचिव मा. श्री. अरुण गडचे, सहसचिवा मा. सौ. वहिदा मुल्ला आणि मुख्याध्यापिका सौ. यास्मीन पठाण यांचे विद्यार्थ्याला प्रोत्साहन व मार्गदर्शन लाभले. मुख्याध्यापिका सौ. यास्मिन पठाण यांनी सांगितले की, "मयुरेश कोळी हा अत्यंत अभ्यासू, शिस्तप्रिय आणि मेहनती विद्यार्थी आहे. त्याने जिद्दीने सातत्याने सराव करत हे यश मिळवले आहे. अशा विद्यार्थ्यामुळे शाळेची शान वाढते." संस्थेच्या अध्यक्षा मा. डॉ. जहिदा मुजावर यांनी यशस्वी मयुरेशचे विशेष अभिनंदन करत त्याला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.या यशस्वी विद्यार्थ्याचे शाळेच्या वतीने तसेच संपूर्ण समाजातर्फे हार्दिक अभिनंदन करण्यात येत असून, त्याच्याकडून भविष्यात आणखी मोठ्या यशाची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Tags:

About The Author

Related Posts

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

सेनगाव पोलीसाची तत्परता अन; विषारी औषध प्राशन तरुणाचा जीव वाचला सेनगाव पोलीसाची तत्परता अन; विषारी औषध प्राशन तरुणाचा जीव वाचला
आधुनिक केसरी न्यूज गोपाल सातपुते  हिंगोली : सेनगाव तालुक्यातील सावरखेडा येथील सामाजिक कार्यकर्ते तथा माजी सरपंच भागवत मुंडे यांनी आपण...
गरजा कमी ठेवा; स्वाभिमानाने जगा : ना.पंकजाताई मुंडे  बीड जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांचा झाला सन्मान..! 
फडणविसांनी तात्काळ राजानीमा द्यावा : हर्षवर्धन सपकाळ
बीडच्या जनतेच्या स्वप्नपूर्तीचा ऐतिहासिक दिवस-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
लाडक्या बहिणींना उद्योग व्यवसायासाठी अर्थसहाय्य : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यकृताचा भाग देऊन २२ वर्षीय करणला भावाने दिले जीवदान! यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी मुख्यमंत्र्यांची मदत
मराठवाड्याच्या सर्वांगिण विकासासाठी अथकपणे काम करू : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही