प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नियुक्ती
आधुनिक केसरी न्यूज
चंद्रपूर : महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दुर्दैवी निधन झाल्यानंतर पक्षात नेतृत्व बदलण्याची प्रक्रिया वेगाने सुरु झाली आहे. महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदावर सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीनंतर आता प्रफुल्ल पटेल यांना पार्टीचे सर्वोच्च पद सोपवले गेले असल्याची माहिती समोर येत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे एकत्रीकरणाच्या बातम्या समोर येत असतानाच झालेला हा नवा बदल सगळ्यांनाच अनपेक्षित असून ज्या वेगाने सगळ्या घडामोडी घडत आहेत त्यामुळे येत्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.प्रफुल्ल पटेल यांची पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती समोर आली असून सर्व प्रमुख नेत्यांनी आणि सहकार्यांनी या निर्णयाला पाठिंबा दिला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात यावर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया सुरु झाल्या आहेत.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List