श्री मारुती मंदिरा समोरील उंच सुबाभळीचे झाड उभ्या चारचाकीवर कोसळले : विजेचे ही शॉर्ट सर्किट : कवठे येमाईत उमेदवार मात्र थोडक्यात बचावले 

श्री मारुती मंदिरा समोरील उंच सुबाभळीचे झाड उभ्या चारचाकीवर कोसळले : विजेचे ही शॉर्ट सर्किट : कवठे येमाईत उमेदवार मात्र थोडक्यात बचावले 

आधुनिक केसरी न्यूज

कवठे येमाई  : दि. ३० शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथील श्री मारुती मंदिरा समोर असलेले सुबाभळीचे उंच झाड आज दुपारी दोनच्या दरम्यान वारा नसताना अचानक कोसळले. जवळच उभ्या असलेल्या प्रा.शेटे पत्रकार यांच्या बोलेरो गाडीवरच हे झाड कोसळल्याने गाडीच्या छताचे मोठे नुकसान झाले. दरम्यान मतदारांच्या गाठीभेटी घेण्यासाठी आलेले टाकळी हाजी -कवठे जिल्हा परिषद गटातील भाजपाचे उमेदवार राजेंद्र गावडे हे त्याच ठिकाणी फोनवर बोलत होते.समवेत कवठे गणाच्या भाजपच्या उमेदवार कांचनताई सांडभोर यांचे पती राजेश सांडभोर व सहकारी ही त्याच परिसरात होते. दरम्यान पत्रकार सुभाष शेटे यांनी गावडे यांना आवाज दिल्याने ते ओट्यावर भेट घेत असतानाच अचानक कडकडाट होऊन ते झाड थेट चारचाकीवर कोसळले तर राजेंद्र सांडभोर व सहकारी श्री मारुतीचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात गेल्याने सर्वच जण थोडक्यात बचावले. दैव बलवत्तर म्हणून आलेले विघ्न गाडीवर झाड कोसळल्याने दूर झाल्याची भावना यावेळी अनेकांनी व्यक्त केली. एकंदरीत कधी काय होईल याची पुसटशी कल्पना देखील कोणाला नसते.त्या ठिकाणी चारचाकी उभी नसती तर मोठ्या अपघाताची  घटना घडण्याची शक्यता ही नाकारता येत  नाही. दरम्यान झाड कोसळताना विजेच्या तारांवर ही फांद्या पडल्याने मोठे शॉर्टसर्किट झाले पण लगेचच ते थांबले.हे सुबाभळीचे पडलेले झाड तात्काळ तोडून रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत करण्यात आला. 
-- सुभाष शेटे,९९७५६७४२८६

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

चंद्रपूरात उद्या शणिवारी सर्वपक्षीय श्रद्धांजली सभा चंद्रपूरात उद्या शणिवारी सर्वपक्षीय श्रद्धांजली सभा
आधुनिक केसरी न्यूज चंद्रपूर : राज्याचे उपमुख्यमंत्री स्व अजित पवार यांचे विमान दुर्घटनेत दुरूखद निधन झाल्याची माहिती समोर आल्यानंतर संपूर्ण...
श्री मारुती मंदिरा समोरील उंच सुबाभळीचे झाड उभ्या चारचाकीवर कोसळले : विजेचे ही शॉर्ट सर्किट : कवठे येमाईत उमेदवार मात्र थोडक्यात बचावले 
चंद्रपूर मनपा महापौर निवडणूक गुंडगिरीच्या दिशेने 
जनसामान्यांचा नेता हरवला : पालकमंत्री डॉ.अशोक उईके
अजित पवार यांचे विमान उडवणारे कॅप्टन सुमित कपूर आणि फर्स्ट ऑफिसर शांभवी पाठक यांचेही दुःखद निधन 
महाराष्ट्राच्या राजकारणातील शिस्तप्रिय, कुशल प्रशासक आणि राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत धक्कादायक आणि दुःखद 
जनसेवेसाठी तत्पर लोकनेता, सहृदय मित्र गमावला : आ सुधीर मुनगंटीवार यांची शोकभावना