अल्प फरकाने काही जागा हुकल्या, पण संघर्ष सुरूच; निकालाचे चिंतन करणार” : आ. किशोर जोरगेवार

अल्प फरकाने काही जागा हुकल्या, पण संघर्ष सुरूच; निकालाचे चिंतन करणार” : आ. किशोर जोरगेवार

आधुनिक केसरी न्यूज

चंद्रपूर  : ही निवडणूक आम्ही पूर्ण ताकतीने, एकजुटीने आणि सकारात्मकतेने लढलो. आमच्याकडे ठोस विकासकामांचा अजेंडा होता आणि त्याच आधारावर आम्ही थेट मतदारांपर्यंत पोहोचलो. मतदारांनी आमच्या कामावर विश्वास ठेवत उमेदवारांना मते दिली. मात्र काही जागा अगदी अल्प फरकाने गमवाव्या लागल्या, त्यामुळे अपेक्षित आकडा गाठता आला नाही,” अशी प्रतिक्रिया आमदार किशोरभाऊ जोरगेवार यांनी व्यक्त केली.

पुढे बोलताना ते म्हणाले, “या निकालाचे आत्मपरीक्षण सर्व नेते व कार्यकर्ते मिळून नक्कीच करू. निवडून आलेले सर्व उमेदवार प्रभागातील शेवटच्या, गरजू घटकापर्यंत विकास पोहोचवण्यासाठी समर्पित भावनेने काम करतील, असा मला पूर्ण विश्वास आहे.”

“भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता कधीही हारणारा नसतो, तो नेहमी लढणारा असतो. जनतेने दिलेला कौल आम्ही पूर्णपणे स्वीकारतो. या निकालातून बोध घेत शहरात भारतीय जनता पक्षाची संघटना पुन्हा अधिक भक्कमपणे उभी करून जनतेच्या सेवेत आम्ही सतत कार्यरत राहू,” असेही आमदार जोरगेवार यांनी स्पष्ट केले.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

वैनगंगा नदीत होळीच्या दिवशी तरुणाचा दुर्दैवी मृत्यू… आरमोरी परिसर शोकसागरात; इंजिनिअर तरुण शुभम रामटेकेचा बुडून अंत..! वैनगंगा नदीत होळीच्या दिवशी तरुणाचा दुर्दैवी मृत्यू… आरमोरी परिसर शोकसागरात; इंजिनिअर तरुण शुभम रामटेकेचा बुडून अंत..!
आधुनिक केसरी न्यूज  गडचिरोली : होळीच्या आनंदमयी सणाला दुःखाची किनार लागल्याची हृदयद्रावक घटना आज सकाळी घडली. आरमोरी येथील गायकवाड चौक...
आखाती संघर्षाची झळ गडचिरोलीपर्यंत; दुबईत अडकलेल्या बुरेवार कुटुंबासाठी तातडीच्या हस्तक्षेपाची गरज
शाळा बंदीचा निर्णय लवकर मागे घ्या; शिक्षक, पालक, विविध संघटना रस्त्यावर 
जिवंत असूनही असहाय! कोमात असलेल्या वृद्ध महिलेसाठी बँक ठरली अंतिम थांबा..!
अनैतिक संबंध तोडल्यावर होणाऱ्या त्रासाला व जाचाला कंटाळून  बदनामीच्या भीतीने पती पत्नीने आत्महत्या करून संपविले जीवन 
धाराशिव जिल्ह्यात पुन्हा अफूच्या शेतीवर छापा
परदेशातील भारतीयांसाठी सुरक्षा इशारा मध्यपूर्व व परिसरातील देशांमध्ये वाढता तणाव; भारतीय नागरिकांसाठी दूतावासांकडून सुरक्षा ॲडव्हायझरी जारी