सिने स्टाईल मगराला पकडण्यात यश ; अपास संस्थेचे रेस्क्यू यशस्वी

सिने स्टाईल मगराला पकडण्यात यश ; अपास संस्थेचे रेस्क्यू यशस्वी

आधुनिक केसरी न्यूज

वरोडा : तालुक्यातीलआल्फर गावातील एका शेताजवळच्या नाल्यातून मोठा मगर पकडण्यात आला आहे. यशस्वी रेस्क्यू ऑपरेशनानंतर त्याला चारगाव धरणात सुरक्षितपणे सोडण्यात आले.अल्फर येथील नितेश तुराणकर हे 31 जानेवारी रोज शनिवारला सकाळी आपल्या शेतात गेले असताना त्यांना त्यांच्या शेतातील नाल्यात मोठा मगर दिसला. तो त्यांच्यावर चाल करून आल्याने ते घाबरले . ही बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली आणि गावकऱ्यांनी मगरीला पाण्यासाठी नाल्याजवळ गर्दी केली.

हे वृत्त तत्काळ वरोड्याच्या वनविभागाला  कळवण्यात आले. त्यानंतर वनविभागाने 'अपास' एनजीओची रेस्क्यू चमूला पाचरण केले.अपास एनजीओच्या चमुने दुपारी एकच्या  सुमारास मगरीला पकडण्याचे प्रयत्न सुरू झाले. जवळपास तीन तास चाललेल्या या  ऑपरेशनमध्ये पाण्यातील मगराला सापळा लावून पकडण्यासाठी रेस्क्यू चमूला खूप कसरत करावी लागली. हे प्रयत्न पाहण्यासाठी गावकरी मोठ्या संख्येने जमा झाले होते. पकडण्यात आलेली मगर स्त्रीलिंगी असून तिची लांबी ८.७ फूट असून वजन जवळपास 300 किलो असल्याची माहिती अपास संस्थेचे विशाल मोरे यांनी दिली. 

सिने चित्रपटात दाखवलेल्या दृशानुसार अपास एनजीओच्या हिरोनी या मगराला पकडतानाताचे दृश्य अनेक गावकऱ्यांनी आपल्या मोबाईल मध्ये कैद केले आहे. हा थरार पाहण्यासाठी मोठ्या संख्येने गावकरी या ठिकाणी उपस्थित होते.

अपास एनजीओच्या चमूने वनविभागाच्या अधिकाऱ्यांसह केलेले संयुक्त प्रयत्न यशस्वी यशस्वी झाले.

रेस्क्यू कार्यामध्ये अपास एनजीओचे विशाल मोरे, हर्षल बाकडे, विवेक मोरे, पंकज खाजणे, प्रशांत राऊत, अमित नन्नावरे, राहुल पानघटे, शुभम भगत, श्रीपाद बाकडे, आशिष चहा काटे यांनी तसेचयं वनपरिषद कार्यालयातील आरएफओ सतीश शेंडे, शेगाव आरक्षी जितेंद्र लोणकर, टेमूर्डा आरक्षी दिवाकर चांभारे आणि आल्फरचे वनरक्षक हजारे यांचा सहभाग होता. अपास एनजीओने तालुक्यात आतापर्यंत पकडलेला हा नववा मगर आहे. गेल्या काही वर्षात मानव-मगर संघर्ष वाढल्यामुळे संस्थेने वनविभाग सोबत मिळून असे अनेक यशस्वी रेस्क्यू ऑपरेशन केले आहेत. गावकऱ्यांनी याप्रसंगी सजगता  दाखवून वनविभागाला माहिती दिल्याने गावकऱ्याचे कौतुक होत आहे. जंगली प्राण्यांचा सामना करण्याऐवजी घटनेची माहिती त्वरित वनविभाग व पोलिसांना याची माहिती द्यावी. त्याचप्रमाणे तलाव व नाले पाण्याने भरल्यानंतर सावधगिरी बाळगावी असे आवाहन वनविभागातर्फे करण्यात आले आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

माझी नियुक्ती झाल्याबद्दलच्या बातम्या पूर्णपणे निराधार, तथ्यहीन : प्रफुल पटेल माझी नियुक्ती झाल्याबद्दलच्या बातम्या पूर्णपणे निराधार, तथ्यहीन : प्रफुल पटेल
आधुनिक केसरी न्यूज मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी माझी नियुक्ती झाल्याबद्दलच्या बातम्या काही प्रसारमाध्यमांमध्ये दाखवल्या जात असून या...
गोंडवाना विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी स्टुडन्ट प्रोफाइल मधील माहिती मराठीतून आद्ययावत करण्याचे आवाहन
प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नियुक्ती 
सिने स्टाईल मगराला पकडण्यात यश ; अपास संस्थेचे रेस्क्यू यशस्वी
सुकमा येथे चार नक्षलवाद्यांची शरणागती; दोन महिला नक्षलवाद्यांचा समावेश
उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमान अपघाताची सखोल चौकशी करून संशयाचे ढग दूर करा
वाघाच्या हल्ल्यात शेतकरी महिला ठार..!