दादांचे स्वप्न पूर्ण करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली : प्रा.पाटील

दादांचे स्वप्न पूर्ण करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली : प्रा.पाटील

आधुनिक केसरी न्यूज

वरोडा : सामान्यांचा कळवळा असणारा माणूस, सामान्यांना आपला वाटणारा, आपल्या घरचा माणूस गेल्याचे दुःख सामान्यांना झाले. अजित पवार यांच्या जाण्याने खचून न जाता, दादांचे जे स्वप्न होते ते पूर्ण करण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांवर असून कार्यकर्त्यांनी धीर न सोडता त्यांच्या स्वप्नांना साकार करण्यासाठी प्रयत्न करावा हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल असे मत लोकशिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा.श्रीकांत पाटील यांनी व्यक्त केले.  येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात 31 जानेवारी रोज शनिवारला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित दादा पवार यांना श्रद्धांजली देण्यासाठी आयोजित सर्वपक्षीय श्रद्धांजली सभेत ते बोलत होते. प्रा. श्रीकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या शोकसभेत खासदार प्रतिभाताई धानोरकर, आमदार करण देवतळे हे उपस्थित होते.

कार्यकर्ता घडविणारे, वेळेचे महत्त्व जाणणारे,सहकार क्षेत्रात आपली पकड निर्माण करणारे खंबीर नेतृत्व आपल्यातून निघून गेल्यामुळे निर्माण झालेली पोकळी भरून निघणे कठीण आहे. अजित पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राने एकसंवेदनशील,कर्तव्यदक्ष व लोकहितासाठी सतत झटणारा नेता गमावला आहे अशी खंत व्यक्त करत आमदार करण देवतळे यांनी आपली श्रद्धांजली अर्पण केली.खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी स्वर्गीय अजित पवार यांना श्रद्धांजली वाहताना, दिलेल्या शब्दाला जागणारा, कामाचा दांडगा अनुभव असणारा व राज्याचा सर्वांगीण विकास कसा करता येईल यासाठी प्रयत्नशील असलेली व्यक्ती आपण गमावली आहे. स्वर्गीय अजित दादांनी चळवळीतून सामान्य माणसाच्या विकासासाठी प्रयत्न केला.त्यांच्या जाण्याने आपण एक सक्षम नेतृत्व गमावले असल्याचे मत व्यक्त केले. 

 या श्रद्धांजली सभेत राष्ट्रवादीचे विधानसभा अध्यक्ष विलास नेरकर, राकाॅच्या  महिला जिल्हाध्यक्ष रंजना पारशिवे,बार असोसिएशनचे अध्यक्ष एडवोकेट गजानन बोढाले, विनायक देवस्थानचे अध्यक्ष राजेश कावलकर भाजपचे ज्येष्ठ नेते बाबा भागडे, गांधी उद्यान योग समितीचे अध्यक्ष बाळासाहेब नेमाडे, पत्रकार राजेंद्र मर्दाने, व्यापारी संघाचे अध्यक्ष शंभुनाथ वरघणे, उबाठाचे विधानसभा प्रमुख बंडूजी डाखणे, नगराध्यक्षा अर्चना ठाकरे यांनी यानीही सभेत आपआपले मनोगत व्यक्त करत दादांना श्रद्धांजली अर्पण केली. सभेनंतर उभे राहत सर्वांनी एक मिनिट मौन पाळून स्वर्गीय दादांना श्रद्धांजली अर्पण केली. श्रद्धांजली सभेचे संचालन राखाचे शहराध्यक्ष चंद्रकांत कुंभारे यांनी केले.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

बंडगार्डन पोलिस ठाण्यातील PSI विरुद्ध लाच मागणीचा गुन्हा; एसीबीची कारवाई बंडगार्डन पोलिस ठाण्यातील PSI विरुद्ध लाच मागणीचा गुन्हा; एसीबीची कारवाई
आधुनिक केसरी न्यूज  संदीप शेलार पुणे : दि.9 मार्च 2026 फसवणुकीच्या तक्रारीत गुन्हा दाखल न करण्यासाठी तक्रारदाराकडे लाखोंची लाच मागितल्याप्रकरणी...
नांदेड येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंत्यांच्या  कार्यालयात 
नांदेड बसस्थानकात बाॅब ब्लास्टची अफवा पसरल्याने खळबळ बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील एकास अटक 
बाफना टी पॉईंट येथे आग : ३ वाहने जळून खाक
उमाप यांच्या पथकांची माळकौठा येथील वाळू घाटावर धाड १ कोटी ४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त 
खाजगी वसतीगृहातील मुलीची गळफास लावून आत्महत्या; मुलीचा मृतदेह ताब्यात घेण्यास मुलींच्या नातेवाइकांचा नकार 
माओवादी चळवळीला मोठा धक्का? वरिष्ठ नेता ‘गणपती’ नेपाळमध्ये ताब्यात असल्याची चर्चा