कुंभार पिंपळगावात सराफा दुकानावर चोरट्यांचा डल्ला,लाखो रूपयांचे दागिने लंपास चोरटे जोमात; पोलिस प्रशासन कोमात
आधुनिक केसरी न्यूज
घनसावंगी : तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथे बुधवारी (ता.२३) रोजी पहाटे चार वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरा तोडून सराफा दुकानावर डल्ला मारत १९ लाख ७६ हजार पाचशे रूपयांचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली आहे. याबाबत ज्ञानेश्वर मधुकर दहीवाळ यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, येथील बसस्थानकाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यालगत ज्ञानेश्वर ज्वेलर्स नावाने त्यांची सराफा दुकान आहे.दहीवाळ हे नेहमीप्रमाणे मंगळवारी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास दुकान बंद करून घरी गेले होते.बुधवारी (ता.२३) रोजी पहाटे चार वाजेच्या सुमारास अज्ञात चार चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तोडफोड करून दुकानाचे शटर उचकटून दुकानात प्रवेश करत १९ लाख ७६ हजार पाचशे रूपयांचे सोने, चांदीचे दागिने लंपास केले आहे.सदरील संपूर्ण घटना बाजूला असलेल्या दुकानात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालेली आहे.याप्रकरणी ज्ञानेश्वर दहीवाळ यांच्या तक्रारीवरून घनसावंगी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा पुढील अधिक तपास सपोनि अशोक खरात हे करीत आहेत.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List