साक्री शहरात दोन गटात वाद; गोळीबार करून संशयित फरार शहरात तणावाचे वातावरण; पोलिसांकडून तपास सुरु,एलसीबीचे पथक दाखल.

साक्री शहरात दोन गटात वाद; गोळीबार करून संशयित फरार शहरात तणावाचे वातावरण; पोलिसांकडून तपास सुरु,एलसीबीचे पथक दाखल.

आधुनिक केसरी न्यूज

 चंद्रशेखर अहिरराव 

साक्री : शहरातील नवापूर रस्त्यावरील विमलबाई महाविद्यालयासमोर कालक (दि. २२) सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास दोन गटांमध्ये वाद झाला.यावेळी एका तरुणाने हवेत गोळीबार करत दहशत निर्माण केल्याची गंभीर घटना घडली असून, गोळी झाडणारा तरुण सध्या फरार आहे. पोलिसांकडून घटनेच्या तपासाला वेग देण्यात आला आहे. रात्री उशिरा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक साक्री शहरात दाखल झाले होते.
प्राथमिक माहितीनुसार, अष्टाणे व साक्री येथील तरुणांच्या दोन गटांमध्ये जुना वाद होता. जो न्यायालयातही पोहोचला होता.
मात्र, दोन्ही गटांनी न्यायालयाबाहेर बसून वाद मिटवण्याचा प्रयत्न केला असताना पुन्हा एकदा वाद उफाळून आला. वाद अधिक चिघळल्याने एका गटातील तरुणाने समोरच्यांवर चाल करून जात मारहाण केल्याचे सांगण्यात येते. या झटापटीत काही तरुण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या प्रकारानंतर साक्रीतील संशयित तरुणाने हवेत गोळी झाडून दुसऱ्या गटाला धमकावल्याची माहिती असून, गोळीबाराच्या आवाजाने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच
साक्री पोलीस निरीक्षक दीपक वळवी यांनी त्वरीत तपासाची चक्रे फिरवत, सीसीटीव्ही फुटेज शोधण्याचे काम सुरू केले आहे. जखमी तरुणांची वैद्यकीय तपासणी सुरू असून,सध्या गोळीबार करणारा तरुण फरार आहे. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत अष्टाणे व कावठे येथील अनेक तरुणांनी पोलीस ठाण्याबाहेर जमाव जमवून संशियित आरोपीविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली. मात्र, रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदवण्यात आलेला नव्हता,अशी माहिती मिळाली. तसेच रात्री उशिराने धुळे येथून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक घटनेच्या तपासासाठी साक्री

पोलीस ठाण्यात ७० ते ८० जाणांचा जमाव
साक्रीतील गोळीबाराच्या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. या प्रकरणात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करत सुमारे ७० ते ८० जणांचा जमाव साक्री पोलीस ठाण्याच्या आवारात रात्री उशिरापर्यंत जमा झाला होता. अष्टाणे व कावठे येथून आलेल्या या तरुणांनी आरोपी तरुणावर तत्काळ गुन्हा दाखल करून त्याला अटक करावी, अशी जोरदार मागणी केली. जमाव आक्रमक होण्याची शक्यता लक्षात घेता पोलीस दल सतर्क झाले होते. या प्रकारामुळे पोलीस ठाण्याबाहेर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, पोलिसांनी संयम राखत परिस्थिती नियंत्रणात ठेवली आणि जमावाला समजावत शांततेत पांगवले. शहरात आले होते. शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, पोलिसांनी तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
घटनेनंतर परिस्थिती नियंत्रणात असून वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत माहिती देण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक वळवी यांनी सांगितले.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

देगलूर पोलिसांचा दमदार कामगिरी; अवैध गुटखा वाहतूक करणारे दोघे गजाआड, ₹14.88 लाखांचा मुद्देमाल जप्त. देगलूर पोलिसांचा दमदार कामगिरी; अवैध गुटखा वाहतूक करणारे दोघे गजाआड, ₹14.88 लाखांचा मुद्देमाल जप्त.
आधुनिक केसरी न्यूज   देगलूर : पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने ‘ऑपरेशन फ्लश आऊट’ अंतर्गत आणखी एक धाडसी कारवाई करत अवैध...
वाशिम जिल्ह्याच्या पिंपरी सरहद्द येथे पुरामुळे ट्रक उलटला; चालक ठार, शेतकऱ्यांचे पुन्हा मोठे नुकसान
साक्री शहरात दोन गटात वाद; गोळीबार करून संशयित फरार शहरात तणावाचे वातावरण; पोलिसांकडून तपास सुरु,एलसीबीचे पथक दाखल.
मोखाड्यात भाजपाच्या वतीने रक्तदान शिबिर
गडचिरोलीला राज्यातील पहिल्या क्रमांकाचा जिल्हा बनविणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
गोवा सरकारकडून रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात ५२ टक्क्यांची ऐतिहासिक वाढ
मोखाडा पोलिसांची धडक कारवाई ; अफू ने भरलेली चारचाकी जप्त.