लोणार तालुक्यात पुन्हा ढग फुटला! रात्रीपासून मुसळधार पाऊस; नदी नाले एक झाले; शेतांमध्ये साचले पाणी; एक जण पुराच्या पाण्यात अडकला; टिन पत्रावर बसून मदतीसाठी याचना..!

लोणार तालुक्यात पुन्हा ढग फुटला! रात्रीपासून मुसळधार पाऊस; नदी नाले एक झाले; शेतांमध्ये साचले पाणी; एक जण पुराच्या पाण्यात अडकला; टिन पत्रावर बसून मदतीसाठी याचना..!

आधुनिक केसरी न्यूज

 प्रणव वराडे

लोणार : तालुक्यात पुन्हा एकदा ढगफुटी झाली आहे. आज २२ जुलैच्या पहाटे ३ वाजेपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे नदी नाले एक झाले असून, शेकडो हेक्टर जमीन पुन्हा एकदा खरडून गेली असल्याचा अंदाज आहे. लोणार तालुक्यातील धाड येथील नदीकाठावर एक व्यक्ती पुराच्या पाण्यात अडकला असून एका टिन-पत्रावर बसून तो मदतीसाठी याचना मागत आहे.*

जुलै महिन्याच्या प्रारंभीच मेहकर लोणार तालुक्यात मोठ्या प्रमाणात ढगफुटी झाली होती. शेतकऱ्यांच्या पेरण्या उखडून केल्या होत्या. शेतकऱ्यांच्या डोळ्यातील आसवे थांबली नसतांनाच आज पुन्हा एकदा मोठे संकट कोसळले आहे. पहाटे ३ वाजेपासून ढग फुटल्यासारखा पाऊस कोसळत आहे. देऊळगाव कुंडपाळ, टिटवी येथील सांडवे ओव्हरफ्लो होऊन फुटले आहेत, गावागावात रस्त्यांवर पाणी घुसले आहे. लोणार शहरात देखील मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. हीरडव, बोरखेडी, गुंधा या भागांत देखील पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. यासंदर्भात नंदूभाऊ मापारी सातत्याने प्रशासनाच्या संपर्कात आहेत. तहसीलदार, ठाणेदार, मंडळ अधिकारी यांना याबाबतची माहिती त्यांनी दिली आहे. काही वेळातच शासनाची यंत्रणा मदतीसाठी पोहोचणार आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

वाशिम जिल्ह्याच्या पिंपरी सरहद्द येथे पुरामुळे ट्रक उलटला; चालक ठार, शेतकऱ्यांचे पुन्हा मोठे नुकसान वाशिम जिल्ह्याच्या पिंपरी सरहद्द येथे पुरामुळे ट्रक उलटला; चालक ठार, शेतकऱ्यांचे पुन्हा मोठे नुकसान
आधुनिक केसरी न्यूज ज़ैनुल आबेद्दीन बुलढाणा :  वाशिम व बुलडाणा जिल्ह्यामध्ये कालपासून पडत असलेल्या संततधार पावसामुळे मेहकर तालुक्यातील शेवटच्या हद्दीवर...
साक्री शहरात दोन गटात वाद; गोळीबार करून संशयित फरार शहरात तणावाचे वातावरण; पोलिसांकडून तपास सुरु,एलसीबीचे पथक दाखल.
मोखाड्यात भाजपाच्या वतीने रक्तदान शिबिर
गडचिरोलीला राज्यातील पहिल्या क्रमांकाचा जिल्हा बनविणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
गोवा सरकारकडून रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात ५२ टक्क्यांची ऐतिहासिक वाढ
मोखाडा पोलिसांची धडक कारवाई ; अफू ने भरलेली चारचाकी जप्त.
लोणार तालुक्यात पुन्हा ढग फुटला! रात्रीपासून मुसळधार पाऊस; नदी नाले एक झाले; शेतांमध्ये साचले पाणी; एक जण पुराच्या पाण्यात अडकला; टिन पत्रावर बसून मदतीसाठी याचना..!