मोखाडा पोलिसांची धडक कारवाई ; अफू ने भरलेली चारचाकी जप्त.
आधुनिक केसरी न्यूज
तेजस रोकडे
मोखाडा : पोलिस ठाणे हद्दीमध्ये दिनांक 21 जुलै रोजी रात्री 2:00 च्या सुमारास मोखाडा त्र्यंबकेश्वर रस्त्याने एक चारचाकी क्रेटा गाडी क्रमांक MP.09.CZ.6669 ही भरधाव वेगाने जात असताना तेथे रात्रौगस्त करत असलेले पोलिस शशिकांत भोये व बापू नागरे यांना संशय आल्याने त्या गाडीचा पाठलाग करण्यात आला, चिंचुतारा गावाच्या जवळ अंधाराचा फायदा घेत गाडी तिथेच ठेवत गाडीचा चालक तेथून पसार झाला. कार मध्ये चौकशी केली असता त्यामध्ये ७ लाख ८० हजार ३४० रुपये किंमतीचा 111.420 किलोग्रॅम वजनाचा अफू वनस्पतीच्या सुकलेल्या बोडांचा चुरा आढळून आला आहे. सदर चारचाकी गाडी व गाडीत आढळून आलेला अफू वनस्पतीचा सुकलेला चुरा मोखाडा पोलिस ठाणे येथे जप्त करण्यात आला आहे. अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून गुन्ह्याचा अधिक तपास मोखाडा पोलीस सहायक पोलिस निरीक्षक प्रेमनाथ ढोले हे करत आहेत.
सदरची कारवाई ही यतिश देशमुख, पोलीस अधीक्षक पालघर, विनायक नरळे अपर पोलीस अधीक्षक पालघर,गणपत पिंगळे उपविभागीय पोलीस अधिकारी, यांच्या मार्गदर्शनाखाली प्रेमनाथ ढोले,पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत दहिफळे, पोलीस भास्कर कोठारी, भोये, कामडी, बापु नागरे, पंकज गुजर सर्व नेमणुक मोखाडा पोलीस ठाणे यांनी केली आहे.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List