वारणाली येथील मल्टीस्पेशालिटी दवाखान्याचे काम गतीने पूर्ण करण्याच्या आयुक्त सत्यम गांधी यांच्या सूचना; तर काळ्याखाणी मधील कारंजे १५ ऑगस्ट पर्यंत सूर होणार
आधुनिक केसरी न्यूज
सुधीर गोखले
सांगली : विश्रामबाग येथील महापालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या वर्णावी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल च्या कामाची पाहणी काळ आयुक्त सत्यम गांधी यांनी केली तसेच काम गतीने पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी संबंधितांना दिल्या. त्याप्रमाणे सांगलीमधील बहुचर्चित काळ्या खाणीच्या सुशोभीकरणाचे कामही गतीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. यावेळी काळ्या खाणीमध्ये बसवलेले कारंजे हे १५ ऑगस्ट पर्यंत सुरु होतील अशी माहिती त्यांनी दिली. आयुक्त सत्यम गांधी यांनी काळ्या खाणी बरोबरच मिरज येथील ई बस चार्जिंग स्टेशन उभारणी हनुमाननगर येथील अग्निशमन विभागाचे बांधकाम चैत्रबन नाल्याच्या कामाची पाहणी केली यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता पृथ्वीराज चव्हाण वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ वैभव पाटील विद्युत विभागाचे अमरसिंह चव्हाण महेश मदने यांच्या सह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. काळ्या खाणीच्या सुशोभीकरणामध्ये १ कोटी रुपयाचा संगीत कारंजा, ५० लाखाचे लेसर शो, फूड मॉल उभारणी अडीच समावेश आहे. यावेळी सत्यम गांधी म्हणाले कि मिरजेतील शासकीय तंत्रनिकेतन च्या आवारात महापालिकेने कोव्हीड च्या काळात उभा केलेला ऑक्सिजन प्लांट वारणाली मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल च्या आवारात स्थलांतरित करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List