जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक लढविण्यासाठी गावपातळीवरील कार्यकर्ते सक्रिय ; आरक्षणाकडे लागल्या सर्वांच्या नजरा
आधुनिक केसरी न्यूज
कुलदीप पवार
घनसावंगी तालुक्यात ७ जिल्हा परिषद सर्कल व १४ पंचायत समिती सर्कल येतात. त्यांची प्रभाग रचना झालेली असून आता भावी उमेदवारांच्या नजरा जिल्हा परिषद व पंचायत समिती आरक्षणाकडे लागल्या आहेत. सध्या आपल्या सर्कलमध्ये कोणते गाव जोडले गेले आहेत. कोणती गावे कमी झालीत यावर खलबते सुरु झाली आहेत. तसेच सर्व पक्षाच्या वतीने या दलाचा लाभ जातीय समीकरणातून कोणाला किती होईल? यावरही चर्चा रंगू लागल्या आहेत. एकुणच भावी उमेदवारांची तगमग वाढल्याचे चित्र घनसावंगी तालुक्यात दिसून येत आहे. नव्याने प्रस्तावित गट व गण रचनेबाबत कोणत्याही नागरिकांना हरकती असल्यास, त्या लेखी स्वरूपात २१ जुलै २०२५ पर्यंत जिल्हाधिकारी, जालना यांच्याकडे सादर कराव्यात. त्या तारखेच्या नंतर आलेल्या हरकती विचारात घेतल्या जाणार नसल्याचे निवडणूक विभागाच्चा वतीने सांगण्यात आले आहे.
घनसावंगी तालुक्यात राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांच्या स्वाक्षरीने घनसावंगी तालुक्यातील जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती गणरचना प्रस्तावित करण्यात आली आहे.तालुक्यात राणी उचेगाव, रांजनी, गुरुपिंप्री, मच्छिन्द्रनाथ चिंचोली, कुंभार पिंपळगाव, अंतरवाली टेभी, राजाटाकळी असे ७ जिल्हा परिषद सर्कल आहेत. यामध्ये गावे व वाड्यांना एकत्रित करून निर्वाचन गट तसेच गण तयार करण्यात आले आहेत. तसेच प्रत्येक गट आणि गणात संबंधित ग्रामपंचायतींच्या हद्दीत येणारी गावे व वस्त्यांचा समावेश करण्यात आला आहे.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List