पुणे ग्रामीण पोलिसांकडून स्वामी चिंचोली अत्याचार प्रकरणातील आरोपीचे स्केच जारी

पुणे ग्रामीण पोलिसांकडून स्वामी चिंचोली अत्याचार प्रकरणातील आरोपीचे स्केच जारी

आधुनिक केसरी न्यूज

निलेश मोरे

दौंड : दि.३ पंढरपूर येथे देवदर्शनासाठी निघालेल्या  कुटुंबावर स्वामी चिंचोली (ता.दौंड) गावाजवळ पहाटे च्या सुमारास गंभीर प्रकार घडला आहे. दिनांक ०१ जुलै २०२५ रोजी पाहटे साडे चार दरम्यान अज्ञात व्यक्तीने त्याच्या साथीदारासह धारदार शस्त्राचा (कोयता) धाक दाखवून कुटुंबाला लुटले.त्यानंतर त्यांच्याबरोबर असलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

या घटनेची नोंद दौंड पोलीस स्टेशनमध्ये झाली असून, घटनेच्या गांभीर्याची दखल घेत वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली १० विशेष तपास पथके गठित करण्यात आली असून. सदर आरोपीचे रेखाचित्र तयार करण्यात आले असून, त्याद्वारे त्याचा शोध घेण्यात येत आहे.

कोणालाही या रेखाचित्रातील व्यक्तीची माहिती असल्यास कृपया खालील अधिकाऱ्यांशी तात्काळ संपर्क साधावा माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल असे आश्वासन पोलीस प्रशासना कडून देण्यात आले आहे .

पोलिस उपअधीक्षक दौंड बापुराव दडस – 9049664673

सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल गावडे (पुणे ग्रामीण) –9823165080

सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ताजी मोहिते (पुणे ग्रामीण) – 8308844004

पोलीस प्रशासन जनतेच्या सहकार्याने या अमानुष घटनेतील आरोपी लवकरात लवकर गजाआड करतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

सगरोळी येथे ओव्हरलोड  रेतीच्या हायवाखाली चिरडून एकाचा मृत्यू ;स्थानिक नागरीकांचा प्रशासना विरुद्ध प्रचंड संताप सगरोळी येथे ओव्हरलोड  रेतीच्या हायवाखाली चिरडून एकाचा मृत्यू ;स्थानिक नागरीकांचा प्रशासना विरुद्ध प्रचंड संताप
आधुनिक केसरी न्यूज  बिलोली : देगलूर–बोधन मार्गावर सगरोळी येथे भरधाव व ओव्हरलोड रेती वाहतूक करणाऱ्या हायव्याने एका व्यक्तीला चिरडल्याची धक्कादायक...
बीएसएफ जवानाने थेट पिस्तूल काढून गोळीबार केला, एका व्यक्तीच्या हनुवटीला लागली गोळी
‘NEET’ पेपरफुटी प्रकरणी मुंबई युवक काँग्रेसचे भाजपा सरकारविरोधात तीव्र आंदोलन
प्रधानमंत्री मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद; हंसराज अहीर यांचा सुरक्षा एस्कॉर्ट वाहन सोडण्याचा निर्णय
तेंदु पत्ता संकलन करणाऱ्या मजुरावर अस्वलाचा हल्ला गंभीर जखमी
अपघातग्रस्त ट्रकमुळे ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात; रस्त्याच्या कडेला उलटून एका प्रवाशाचा मृत्यू, दहा जखमी 
साईलाला गँगच्या १२ सदस्यांवर मकोका अंतर्गत कारवाई