वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रभावी व्यवस्था उभी करावी : आमदार किशोर जोरगेवार यांची विधानसभेत मागणी
आधुनिक केसरी न्यूज
चंद्रपूर : महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वारकरी आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरच्या यात्रेला निघत असतात. या यात्रेमध्ये दरवर्षीच काही प्रमाणात अपघात होऊन अनेकांना आपला जीवही गमवावा लागतो. या पार्श्वभूमीवर चंद्रपूर विधानसभा निर्वाच्या क्षेत्राचे आमदार किशोर जोरगवार यांनी आज विधानसभेत पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर वारीसाठी पायी निघणाऱ्या वारकऱ्यांच्या सुरक्षिततेचा अत्यंत महत्वाचा मुद्दा उपस्थित केला. दरवर्षी लाखो वारकरी आपापल्या भागातील दिंड्यांच्या माध्यमातून विठुरायाच्या दर्शनासाठी मोठ्या श्रद्धेने पायी प्रवास करतात. मात्र, रस्त्यांवरील अपुऱ्या सुरक्षाव्यवस्थेमुळे दरवर्षी अनेक अपघात घडतात आणि त्यातून जीवितहानी होते.
अशाच एका दुःखद घटनेत चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवासी स्व. आकाश बनकर यांचा अपघाती मृत्यू झाला होता. अशा घटना केवळ एक व्यक्ती गमावण्यापुरत्या मर्यादित राहत नाहीत, तर संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होते. या पार्श्वभूमीवर सरकारने या गंभीर समस्येकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अपघात टाळण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात व वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रभावी व्यवस्था उभी करावी, अशी ठाम मागणी सभागृहात केली. वारकऱ्यांची ही परंपरा अखंड राहावी, त्यांची सेवा हे आपले कर्तव्य आहे, ही भावना ठेवून आपण यासाठी सदैव तत्पर आहोत. असेही आमदार जोरगेवार यांनी यावेळी आपले मत मांडले.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List