6 जुलै ते 8 जुलै ,2025 या कालावधीत चंद्रपूर  जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट 

चंद्रपूर जिल्ह्यात विजांच्‍या कडकडाटासह मुसळधार ते अति मुसळधार पाऊसाची शक्‍यता

6 जुलै ते 8 जुलै ,2025 या कालावधीत चंद्रपूर  जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट 

आधुनिक केसरी न्यूज
 
नागपूर : प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या सूचनेनुसार दिनांक 6 जुलै ते 8 जुलै , 2025 या कालावधीत चंद्रपूर  जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या कालावधीत चंद्रपूर जिल्ह्यात विजांच्‍या कडकडाटासह मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता वर्तविली आहे. 
 
खबरदारीची उपाययोजना म्हणून नागरीकांनी पुढील प्रमाणे काळजी घ्यावी.
• संरक्षणात्‍मक कपडे घाला आणि घरात आश्रय घ्‍या. 
• मुसळधार पाऊस आणि जोरदार वारा असताना खिडक्‍या आणि दरवाज्‍यापासून दुर रहा. 
• रोडवे अंडरपास, ड्रेनेजचे खड्डे, सखल भाग आणि जिथे पाणी साठते अशा भागातुन जाणे टाळा . 
• खराब दृश्‍यमानतेमुळे मुसळधार पाऊसात वाहने चालवणे टाळा.
• पॉवर लाईन्‍स किंवा विजेच्‍या तारांपासून दुर रहा.
• फ्लॅश पुर चेतावणी किंवा विजेच्‍या तारोपासून दुर रहा. 
वादळ, मेघ गर्जना आणि आकाशात विजा चमकत असताना : काय करावे आणि काय करु नये 
• विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा. 
• जर मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा. आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका. 
• आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्या वस्तू त्वरित बंद करा. 
• तारांचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूंपासून दूर रहा. पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा.
• आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करू नका. 
• शॉवरखाली अंघोळ करू नका. घरातील बेसिनचे नळ, पाण्याची पाईपलाइन यांना स्पर्श करू नका तसेच कुठल्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नका. 
• विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असताना लोखंडी धातूच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका. 
• उंच झाडाच्या खाली आसरा घेऊ नका. 
• धातूंच्या उंच मनोऱ्याजवळ उभे टाकू नका. 
• जर आपण घरात असाल तर उघड्या दारातून अथवा खिडकीतून वीज पडताना पाहू नका. हे बाहेर थांबण्याइतकेच धोकादायक आहे.
 
जिल्ह्यातील नागरिकांना सतर्क आणि सुरक्षित राहण्याचे व मुसळधार पावसामुळे नदी नाले किंवा पुलावरून पाणी ओसंडून वाहत असेल तर ते ओलांडू नये उचित काळजी घ्‍यावी असे आवाहन जिल्हाधिकारी श्री विनय गौडा जी सी व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्यामार्फत करण्‍यात आलेला आहे.
Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

6 जुलै ते 8 जुलै ,2025 या कालावधीत चंद्रपूर  जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट  6 जुलै ते 8 जुलै ,2025 या कालावधीत चंद्रपूर  जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट 
आधुनिक केसरी न्यूज   नागपूर : प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या सूचनेनुसार दिनांक 6 जुलै ते 8 जुलै , 2025 या कालावधीत...
महाराष्ट्रधर्म..थांबलाच नाही..साखळी कधी तुटली नाही! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्टचा प्रारंभ
महापालिकेत एकहाती सत्ता आणू : पालकमंत्री अशोक उईके
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मानाचे वारकरी दाम्पत्य श्री.कैलास दामू उगले व श्रीमती कल्पना कैलास उगले यांचा सत्कार
पंढरपूरहून परतताना भिगवणमध्ये दुचाकीला अज्ञात टँकर वाहनाची धडक ; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू,पत्नी गंभीर जखमी
आषाढवारीत लाखो वारकरी नाथचरणी नतमस्तक ;मात्र पाऊस नसल्याने शेयकर्यांची चिंता वाढली 
पालकमंत्र्यांकडून आदिवासी विकास विभागाचा आढावा