आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष 2025 निमित्त संवाद मेळावा संपन्न
आधुनिक केसरी न्यूज
चंद्रपूर : सहकार भारती जिल्हा चंद्रपूर द्वारे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष निमित्त *संवाद मेळावा* कार्यक्रम १ जुलै रोजी डॉ हेडगेवार जन्मशताब्दी सेवा समिती पूर्व विदर्भ द्वारा संचालित आश्रय छात्रावास चंद्रपूर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
सहकार भारती जिल्हा चंद्रपूर द्वारे प्रथमच आयोजित या आगळ्या वेगळ्या संवाद मेळाव्यात जिल्ह्यातील अनेक सहकारी संस्था तसेच सहकारी बँकांचे पदाधिकारी व संचालक गण मोठ्या संख्येत उपस्थित होते.
या कार्यक्रमात सहकार भारती महाराष्ट्र प्रदेश चे महामंत्री श्री विवेक जुगादे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते.
श्री जुगादे यांनी सहकारी संस्था सुरळीत चालण्या साठी मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच या क्षेत्रातल्या समस्यांवर मात करून संस्थेच्या उत्तरोत्तर प्रगती साठी काय उपाययोजना केल्या गेल्या पाहिजे यावर सुद्धा योग्य प्रकाश टाकला. तसेच आलेल्या समस्यांच निराकरण शासना कडून लवकरात लवकर योग्य रित्या करून देण्याचे आश्वासन ही प्रदेश महामंत्री श्री जुगादे यांनी दिले.
या कार्यक्रमात सहकार भारती चे प्रदेश सचिव श्री विनोद भीमनवार, नागपूर विभाग प्रमुख श्री संजय रोकडे, सहप्रमुख श्री विजय गोटे, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष श्री सतीश वासमवार, महामंत्री सौ. पुष्पा गोटे , चंद्रपूर जिल्हा महिला प्रमुख सौ प्रगती माढई, सहप्रमुख सौ भारती चुनडे सोबत अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्र संचलन जिल्हा उपाध्यक्ष श्री सूरज बोमावार यांनी केले.कार्यक्रमाची सांगता सामूहिक पसायदान म्हणून झाली .
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List