माजी आ.रोहिदास चव्हाणांनी केली अपघातग्रस्तांना मदत

माजी आ.रोहिदास चव्हाणांनी केली अपघातग्रस्तांना मदत

आधुनिक केसरी न्यूज

मोहन पवार

लोहा : म्हणतात ना की "देव तारी त्याला कोण मारी" या म्हणीप्रमाणे  आज दि. (२४) रोजी लातूर ते लोहा प्रवासादरम्यान असिच एक थरार अनूभव शिवसेनेचे ज्येष्ठ नेते लातूर जिल्हा संपर्कप्रमुख माजी आमदार रोहिदास चव्हाण यांनी व नूतन लोहा दक्षिण तालुका प्रमुख भिमराव पाटील शिंदे यांनी पाहता क्षणी अपघात ग्रस्थाच्या मदतीला तात्काळ धावले.अन् एका क्षणाचाही विलंब न लागता तात्काळ गाडी थांबवून मदतीला हात पुढे सरसावले.याबाबत सविस्तर वृत्त असे की लोह्याचे भुमिपूत्र लातूर जिल्हा संपर्कप्रमुख माजी आमदार रोहिदास चव्हाण व तालुका प्रमुख भिमराव पाटील शिंदे हे लातुरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या नेतृत्वाखाली बैठकीचे दि.(२४) रोजी आयोजन करण्यात आले असल्यामुळे  ते लातूर ला गेले होते.बैठक पार पाडून लोह्याकडे परतीचा प्रवास सुरू असताना आष्टांमोडच्या पुढे टोल नाक्या जवळ मोटार सायकलचा अपघात झाला असल्याचे दिसता क्षणी समोर दृष्य अंगावर शहारे आणणारे दिसले मोटरसायकल वरील अपघाताचे सदर अपघात पाहून क्षणाचाही विलंब न लावता अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी माजी आमदार रोहिदास चव्हाण यांनी आपली गाडी थांबवली व अपघातग्रस्तांना मदत केली.ना यांनी त्यांची जात पाहिली ना धर्म अपघात ग्रस्त रक्ताच्या थारोळ्यात पाहता क्षणी त्यांस फक्त मदत अन् मदतच दिली.स्व.बाळासाहेबांच्या शिकवणी प्रमाणे मदतीला धावून संबंधित अपघाताची माहिती तात्काळ शासकीय रुग्णालय चाकूर व पोलीस स्टेशनला दिली.अपघातग्रस्तांना चांगलीच दुखापत झाल्यामुळे त्यांना त्रासदायक वेदना सुरू होत्या. माजी आमदार चव्हाणांनी कसलाच विचार न करता त्यांना तात्काळ आपल्या गाडीमध्ये टाकून चाकूर येथील शासकीय दवाखान्याकडे गाडी घेऊन रवाना झाले. तद्नंतर टोलच्या जवळ आल्यानंतर समोरून ॲम्बुलन्सची गाडी आली त्या गाडीमध्ये अपघातग्रस्ताला तात्काळ सुविधा उपलब्ध करून देत  स्वतः शासकीय रुग्णालयात दाखल केले.असा हा माणसात देव पाहणारा माणूस म्हणून अनेकांनी रोहिदास चव्हाणांचे आदर्श दायी, प्रेरणादायी उदाहरण असल्याचे अनेक जण त्यावेळी बोलून दाखवत होते. हिंदुऱ्हद्यसम्राट  शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेली शिकवण त्यांच्या विचाराने आयुष्यभर केलेलं काम त्याच माध्यमातून मी अपघातग्रस्तांना मदत केली अशी भावना प्रस्तुत प्रतिनिधींशी बोलतांना लातूर जिल्हा संपर्कप्रमुख माजी आमदार रोहिदास चव्हाणांनी व्यक्त केली.तसेच आपल्या अमूल्य वेळेने जर एखाद्या रूग्णाचे प्राण वाचू शकले तर आपण खुप काही कमावलं.आयूष्यात असे चित्तथरारक प्रसंग अनेक मी वेळा अनूभवले व नाहिरे वाल्यांची दुःखी, पिडीत शोषितांची, संकटग्रस्तांची मदत केली असल्याचेही त्यांनी सांगितले.यात खरं पुण्य आहे असेही ते म्हणाले.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७५० व्या जयंती वर्षानिमित्त सुवर्ण कलशाचे पूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७५० व्या जयंती वर्षानिमित्त सुवर्ण कलशाचे पूजन
आधुनिक केसरी न्यूज रोहित दळवी पुणे : दि.१५ संत ज्ञानेश्वर महाराजांनी पसायदानद्वारे अखिल विश्वाच्या कल्याणाची भावना मांडली आहे.  ज्ञानेश्वरीतील हा...
दशसूत्री’बाबत जाणून घेण्यासाठी शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे अचानक छत्रपती संभाजीनगरला
आपेगावी संत ज्ञानेश्वर मंदिरावर जन्मोत्सवा निमित्ताने फुलांच्या आरास आणि  आकर्षक रोषणाई 
काँग्रेस कार्यालय टिळक भवनमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून घेत चोरी सोन्याच्या शिरोलीतील प्रकाराने महिला भयभीत
स्वातंत्र्यदिनी कोणी काय खावे हे सरकार ठरवणार का? भाजपा आणि स्वातंत्र्यदिनाचा संबंधच काय?: हर्षवर्धन सपकाळ.
कॅनॉल मध्ये उडी मारून आत्महत्या करणाऱ्या महिलेचे पोलीस कर्मचाऱ्यांनी वाचवले प्राण