महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून घेत चोरी सोन्याच्या शिरोलीतील प्रकाराने महिला भयभीत

महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून घेत चोरी सोन्याच्या शिरोलीतील प्रकाराने महिला भयभीत

आधुनिक केसरी न्यूज

कुडूत्री : दुकानातील चॉकलेट मागण्याचा बहाणा करत व  महिलेला बोलण्यात गुंतवत अज्ञात दोन चोरट्यानी रुक्मिणी मारुती राऊत वय(६२) या महिलेच्या गळ्यातील पाऊण तोळ्याचे मंगळसूत्र हिसकावून पलायन केले. हा प्रकार सोन्याची शिरोली (ता. राधानगरी) येथे दुपारी तीन वाजता घडला.गावासह परिसरात या प्रकाराने महिलांमध्ये घबराट निर्माण झाली असून सावधानता बाळगणे महत्वाचे बनले आहे. 

घटनास्थळा वरून मिळालेली अधिक माहिती अशी राधानगरी सो.शिरोली मुख्य रस्त्यावर गणेश मंदिर शेजारी राऊत कुटुंबियांचे किराणा मालाचे दुकान आहे.दुकानांमध्ये संबंधित महिला नेहमीप्रमाणे बसली असता.अज्ञात दोन चोरट्यापैकी एकाने मोटारसायकल चालू ठेवत दुसऱ्या चोरट्याने त्या महिलेकडे पाच रुपये देत चॉकलेटची मागणी केली.चॉकलेट देण्यात ती महिला व्यस्त असताना गळ्यातील दोन महिन्यांपूर्वी नव्यानेच केलेले मंगळसूत्र हिसकावून घेतले.या वेळी मोठी झटापट झाली आणि एका चोरट्याचे पायातील चप्पल  तसेच घटनास्थळी टाकून पलायन केले. गावातील एक दोन व्यक्तीनी त्यांचा पाठलाग केला पण चोरटे पळून जाण्यात यशस्वी ठरले व राधानगरी- पिरळ मार्गे पलायन केले.घडलेला हा प्रकार पंचक्रोशीसह सर्वत्र वाऱ्यासारखा  पसरला.आणि परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. या घटनेचा पंचनामा केला असून  राधानगरीचे पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास राधानगरी पोलिस करत आहेत.

 टेहळणी करून चोरी : अज्ञात चोरट्यानी दुकान  परिसरात कोणीही नसल्याचे पाहून व पाळत ठेवत ही चोरी केली.व चोरटे चोरी करण्यात यशस्वी ठरले. त्यानी चॉकलेट साठी दिलेले सुट्टे पाच रुपये व देण्यात आलेली चॉकलेट काऊंटरवर तसेच सोडून चोरटे मंगळसूत्र हिसकावून घेत पळून गेले.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून घेत चोरी सोन्याच्या शिरोलीतील प्रकाराने महिला भयभीत महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून घेत चोरी सोन्याच्या शिरोलीतील प्रकाराने महिला भयभीत
आधुनिक केसरी न्यूज कुडूत्री : दुकानातील चॉकलेट मागण्याचा बहाणा करत व  महिलेला बोलण्यात गुंतवत अज्ञात दोन चोरट्यानी रुक्मिणी मारुती राऊत...
स्वातंत्र्यदिनी कोणी काय खावे हे सरकार ठरवणार का? भाजपा आणि स्वातंत्र्यदिनाचा संबंधच काय?: हर्षवर्धन सपकाळ.
कॅनॉल मध्ये उडी मारून आत्महत्या करणाऱ्या महिलेचे पोलीस कर्मचाऱ्यांनी वाचवले प्राण
रक्षाबंधनानिमित्त एसटीला तब्बल १३७ कोटी रुपयांचे उत्पन्न परिवहन मंत्र्यांनी केले एसटी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन 
संत नगरीच्या शिरपेचात मानाचा तुरा ; जिल्ह्यातील सर्वात उंच राष्ट्रीय ध्वज शेगाव रेल्वे स्थानक परिसरात फडकला
विधान परिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे गुरुवारी परभणी दौर्‍यावर
संत चोखासागराचे तीन वक्रद्वार  उघडले  २८.३४ दलघमी विसर्ग,१९ गावांना सतर्कतेचा इशारा