संत नगरीच्या शिरपेचात मानाचा तुरा ; जिल्ह्यातील सर्वात उंच राष्ट्रीय ध्वज शेगाव रेल्वे स्थानक परिसरात फडकला
आधुनिक केसरी न्यूज
शेगाव : दि.११ प्रतिनिधी विदर्भाच्या पंढरी असलेल्या संत नगरीत शेगांव ला देशभक्तीचा उत्साह अधिक वृद्धिंगत करणारा मानाचा क्षण १० ऑगस्ट रोजी साक्षीला आला. ३० बाय २० फूट आकाराचा आणि जिल्ह्यात आकार व उंची या दोन्ही बाबतीत सर्वात मोठा असलेला बहूतांशी राष्ट्रीय ध्वज रविवारी शेगाव रेल्वे स्थानक परिसरात अभिमानाने फडकविण्यात आला. निळ्या आकाशात तिरंगा डोलताना पाहून नागरिकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले.
या भव्य ध्वजारोहण सोहळ्यात स्टेशन अधीक्षक, रेल्वे पोलीस दल, रेल्वे सुरक्षा बलाचे जवान, तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी एकसाथ ‘भारत माता की जय’च्या घोषणा देत राष्ट्रीय ध्वजाला सलामी दिली. वाऱ्याच्या झुळुकीत लहरणारा तिरंगा पाहून परिसर देशभक्तीच्या भावनेने भारावून गेला.
रेल्वे स्थानक परिसरात उभारलेला हा ध्वज केवळ सौंदर्यवर्धन नाही तर शेगावच्या शिरपेचातील आणखी एक मानाचा तुरा आहे. देशाच्या स्वातंत्र्याचा, ऐक्याचा आणि अभिमानाचा संदेश देणारा हा तिरंगा दूरवरूनच भाविक आणि पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहे.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List