मोखाड्यात शिवसेना उबाठा पक्षाच्या वतीने कृषीमंत्र्याच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन.
आधुनिक केसरी न्यूज
तेजस रोकडे
मोखाडा : विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे ऑनलाईन जंगली रमी खेळताना चा व्हिडिओ सर्व प्रसार माध्यमांवर व्हायरल झाला होता.या घटनेनंतर राज्यातील विरोधकांनी कृषीमंत्री कोकाटे यांनी राजीनामा द्यावा यासाठी रान उठवले होते.त्यानुषंगाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने मोखाडा तालुकाप्रमुख दिलीप मोंहडकर यांच्या नेतृत्वाखाली मोखाडा बसस्थानक येथे कृषीमंत्री कोकाटे यांची प्रतिकात्मक प्रेत यात्रा काढून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे.
राज्यातील शेतकऱ्यांच्या पिकांना योग्य हमीभाव नाही,खते वेळेवर मिळत नाहीत, अवकाळी मुळे हातातोंडाशी आलेली पिके भुईसपाट होत आहेत.अशा एकनानेक संकटाशी लढणार्या शेतकऱ्यांला अधिवेशनात उपयोगी विधेयक मांडून चांगला हमीभाव, नुकसानग्रस्तांना मदत, सातबारा वरील वर्षानुवर्षीचा आर्थिक बोजा कमी करुन सातबारा कोरा करावा यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असताना ही राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात जंगली रमी हा पत्याचा ऑनलाईन गेम खेळत असल्याचा व्हिडिओ प्रसार माध्यमांवर व्हायरल झाला होता यानंतर सर्वत्र विविध संघटना,विरोधी पक्षाने तीव्र आंदोलन करत कृषीमंत्री कोकाटे यांनी राजीनामा द्यावा असा सुर निघाला होता.त्यामुळे मोखाडा तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने देखील मोखाड्यात शिवसेनीकांनी एकत्र येत नगरपंचायत पासून बसस्थानका पर्यंत कोकाटे यांची प्रेत यात्रा काढून विरोधात जोरदार घोषणाबाजी केली यावेळी सातबारा कोरा करा, कृषीमंत्री कोकाटे यांनी नैतिकता दाखवत राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली.मोखाडा बसस्थानक येथे प्रेत यात्रा आल्यावर शिवसेना पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हवेत पत्ते फेकत घोषणाबाजी केली व त्यानंतर कृषीमंत्र्याच्या प्रतिमात्मक पुतळ्याला आग लावली यावेळी तालुकाप्रमुख दिलीप मोंहडकर,तालुका संघटक दिलीप बांडे,निलेश निंबारे,जैष्ठ शिवसैनिक पांडुरंग चौधरी,रविंद्र कटिलकर,माजी नगरसेवक ॠषीकेश लोखंडे,मनोज लचके,सौरभ आहेर,जयेश जाधव,सनी झिंजुर्डे, प्रकाश आरडे आदी पदाधिकारी उपस्थित होते..
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List