मानवत पोलिस स्टेशनवर मुक मोर्चा, माझ्या पप्पाच्या खुन्याला कधी पकडणार : गायत्री पवार

मानवत पोलिस स्टेशनवर मुक मोर्चा, माझ्या पप्पाच्या खुन्याला कधी पकडणार : गायत्री पवार

आधुनिक केसरी न्यूज

विलास बारहाते

मानवत : मानवत येथील स्व. ज्ञानेश्वर वैजनाथराव पवार यांची अमानुष हत्या करणारा फरार आरोपी मारोती भगवान चव्हाण यास तात्काळ अटक करण्यात यावी या संदर्भात आज ३१ जुलै रोजी पोलिस स्टेशनवर सकल समाज बांधव व परिसरातील नागरीकांच्या वतीने संत जगनाडे महाराज चौक ते मुख्य रस्त्याने पोलिस स्टेशनवर मुक मोर्चा काढण्यात आला. व पोलिस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले. २६ जुलै २०२५ रोजी आमच्या समाजातील स्व. ज्ञानेश्वर वैजनाथराव पवार यांचा अत्यंत अमानुष क्रूरपणे खून केला आहे. या प्रकरणात आरोपी मारोती भगवानराव चव्हाण याने कुदळीने सपासप वार करुन ज्ञानेश्वर पवार यांचा निर्घुनपणे खुन केला आणि तो घटनेनंतर पलायन करुन फरार झाला आहे.

सदर प्रकारामुळे संपूर्ण परिसरात भितीचे आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले असून समाज बांधवात तिव्र नाराजी आहे. या गंभीर गुन्ह्यानंतरही अजुन आरोपी मोकाट आहे. हे अत्यंत दुःखद व चिंता निर्माण करणारे आहे. निवेदनावर असंख्य महिला, समाज बांधव व परिसरातील नागरिकांच्या स्वाक्षरी आहेत. समस्त समाज बांधवांतर्फे पोलिस प्रशासनास खालील मागण्या करण्यात येत आहेत.

१) मारोती भगवानराव चव्हाण यास तात्काळ शोधून काढुन अटक करण्यात यावी.

२) या प्रकरणाचा सखोल तपास करुन दोषीवर कठोर कारवाई करण्यात यावी.

३) स्व. ज्ञानेश्वर वैजनाथराव पवार यांच्या कुटूंबाला न्याय मिळेल याची खात्री पोलीस प्रशासनाने द्यावी.

४) आरोपीस मदत करणाऱ्यांवरही कायदेशीर कारवाई करण्यात यावी.

५) पुढील ४८ तासात आरोपीस अटक नाही केल्यास मानवत बंद करुन तिव्र आंदोलन करण्यात येईल या प्रकरणाची सर्व काही जबाबदारी पोलीस प्रशासनाची राहील.
पोलीस प्रशासनावर आमचा विश्वास आहे की, आपण या गंभीर प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन योग्य ती कारवाई तात्काळ कराल.जर वरील मागण्यांकडे तातडीने लक्ष दिले गेले नाही, तर समाज बांधवांना न्यायासाठी शांततामय परंतु तीव्र स्वरुपाचे आंदोलन करावे लागेल, याची कृपया नोंद घ्यावी.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

पलूस येथे बनावट सोने गहाण ठेवून स्टेट बँकेची फसवणूक,सहकार क्षेत्रात खळबळ..! पलूस येथे बनावट सोने गहाण ठेवून स्टेट बँकेची फसवणूक,सहकार क्षेत्रात खळबळ..!
आधुनिक केसरी न्यूज दिनेश कांबळे पलूस : स्वतःच्या व कर्जदाराच्या फायद्यासाठी तिघांनी संगणमत करून पलूस येथील स्टेट बँक फ इंडिया...
मानवत पोलिस स्टेशनवर मुक मोर्चा, माझ्या पप्पाच्या खुन्याला कधी पकडणार : गायत्री पवार
नाथसागराचे १८ दरवाजे  उघडले ; पाणी पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी
श्रीच्या पालखीचे मोठ्या उत्साहात स्वगृही स्वागत ; दोन लाख भाविकांची पायदळ वारी, धन्य आजी दिन संत दर्शनाचा..!
मोखाड्यात शिवसेना उबाठा पक्षाच्या वतीने कृषीमंत्र्याच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन.
उद्धव ठाकरेंचा वाढदिवस मांजरीत विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा 
उत्सवांच्या काळामध्ये डीजे चा दणदणाट सहन केला जाणार नाही; पोलीस अधीक्षक संदीप घुगेंची मंडळांना तंबी