छत्रपती संभाजीनगर मध्ये गुन्हेगारीचा कहर! मोटारसायकल, मोबाईल लंपास ; चोरट्याना कुठेय पोलिसांचा धाक
आधुनिक केसरी न्यूज
छत्रपती संभाजी नगर : आकाशवाणी सिग्नल येथे दि.२४ रोजी सकाळी ८ वाजता सृष्टी दिनेशराव सुरकार जॉब वर जात असताना दोन बाईक स्वाराने तिच्या हातातील मोबाईल हिसकावून फरार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मोबाईल वन प्लस १३ आर असून सृष्टी सुरकार हिने जव्हार नगर पोलीस स्टेशन छत्रपती संभाजीनगर येथे धाव घेऊन एफआयआर दाखल केला आहे. शहरात दररोज चोरीच्या घटना घडत आहेत,
इरफान लतिफ शहा डिटेक्ट पॅथॉलॉजी लॅब मध्ये मॅनेजर पदावर कार्यरत आहेत रिलायन्स मॉलच्या बाजूला त्यांची गाडी पार्किंग मधून चोरीला गेली आहे. लतीफ शहा यांनी पुंडलिक नगर पोलीस स्टेशन येथे लेखी स्वरूपात तक्रार केली आहे.मोटर सायकल एच एफ डिलक्स MH20FL6475, या क्रमाकांची असून दि. ८ जुलै रोजी दुपारी २ ते सायंकाळी ६ दरम्यान डिटेक्ट पॅथॉलॉजी लॅब रिलायन्स मॉल च्या बाजूला छत्रपती संभाजीनगर येथून अज्ञात चोरट्याने बाईक चोरी केली आहे. चोरट्याना पोलिसाचा धाकच राहिला नसल्याचे दिसत आहे. मोटार सायकल नंतर मोबाईल चोरल्याने नागरिकांमध्ये भीती निर्माण झाले आहे.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List