गारखेडा कारगिल उद्यानात कारगिल विजय दिवस उत्साहात साजरा

गारखेडा कारगिल उद्यानात कारगिल विजय दिवस उत्साहात साजरा

आधुनिक केसरी न्यूज

अक्षय ताठे

छत्रपती संभाजीनगर : गारखेडा येथील कारगिल उद्यानात आज २६ जुलै रोजी कारगिल विजय दिवस अत्यंत देशभक्तिपूर्ण वातावरणात व उत्साहात साजरा करण्यात आला. १९९९ साली कारगिल युद्धात बलिदान दिलेल्या शूरवीर भारतीय जवानांना यावेळी फुलांपुष्पांद्वारे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमात स्थानिक नागरिक, विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते आणि माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. देशभक्तिपर गीतं, भाषणं आणि ध्वजवंदना यांमुळे परिसरात देशाभिमानाची ऊर्जा निर्माण झाली.कार्यक्रमाचे आयोजन स्थानिक सामाजिक संस्थांच्या सहकार्याने करण्यात आले होते. उपस्थितांनी "सुनो गौर से दुनिया वालो" या गीतावर एकत्रितरित्या सलामी देत वीरांना मानवंदना दिली.

"देशासाठी प्राण अर्पण करणारे वीर अमर आहेत, त्यांचे स्मरण म्हणजेच खरी देशसेवा," असे प्रतिपादन यावेळी उपस्थित मान्यवरांनी केले.स्थानिक आमदार आणि राज्याचे इतर
मागासवर्गीय (ओबीसी) विभागाचे मंत्री अतुल सावे यांनी कारगिल स्मृती वनसाठी सहा कोटी रुपयांचा विशेष निधी मिळविण्यासाठी केलेल्या प्रयत्नांसाठी या कार्यक्रमात सन्मानित केले. मुलांमध्ये देशभक्तीची  ज्योत पेटवण्यासाठी गायक प्रमोद सरकटे यांनी सुंदर सादरीकरण केले. कारगिल स्मृती वन समितीचे पंकज भारसाखळे, राजेंद्र जंजाळ, विमल केंद्रे, ज्योती मोरे, शशांक विसपुते, पंडित केंद्रे, जसवंत सिंग राजपूत, सुदाम सोळुंके, भाऊलाल नागरे, जगदीश चव्हाण, अर्जुन गवारे, स्वराज सरकटे, गजानन पिंपळे यांच्यासह आयोजक समितीने विद्यार्थी आणि देशभक्त नागरिकाची उपस्थिती होती.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

छत्रपती संभाजीनगर मध्ये गुन्हेगारीचा कहर! मोटारसायकल, मोबाईल लंपास ; चोरट्याना कुठेय पोलिसांचा धाक  छत्रपती संभाजीनगर मध्ये गुन्हेगारीचा कहर! मोटारसायकल, मोबाईल लंपास ; चोरट्याना कुठेय पोलिसांचा धाक 
आधुनिक केसरी न्यूज छत्रपती संभाजी नगर : आकाशवाणी सिग्नल येथे दि.२४ रोजी सकाळी ८ वाजता सृष्टी दिनेशराव सुरकार जॉब वर...
गारखेडा कारगिल उद्यानात कारगिल विजय दिवस उत्साहात साजरा
गोंदियात पावसाचे थैमान जिल्हा प्रशासन अलर्ट  जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर
मिनी ट्रकने धडक दिल्याने दुचाकी चालकाचा मृत्यू
गोव्यातील ICAR-CCARI संस्थेला देशातील सर्वोच्च कृषी सन्मान, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले शास्त्रज्ञांचे अभिनंदन
25 जुलै रोजी जिल्ह्यातील शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
एसटी व मोटरसायकलच्या अपघातात महिला ठार