मित्राच्या घरून परततांना शिक्षकाचा पुरात वाहून मृत्यू अन गावावर शोककळा...!

मित्राच्या घरून परततांना शिक्षकाचा पुरात वाहून मृत्यू अन गावावर शोककळा...!

आधुनिक केसरी न्यूज

गोंदिया : सालेकसा - दरेकसा येथील रहिवासी माजी जिल्हा परिषद सदस्य व आदीवासी सेवक शंकरलाल मडावी यांचे चिरंजीव  शिक्षक टिकेश मडावी (४५) यांचा जमाकुडो आणि कोपालगड दरम्यान वाहणाऱ्या नाल्याला आलेल्या पुरात वाहून गेल्याने मृत्यू झाल्याची दुःखद घटना २३ जुलै च्या रात्री घडली आहे. २३ जुलैच्या सायंकाळी सालेकसा तालुक्यात मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे सर्वत्र नाल्यांना मोठा पुर आला. दरम्यान सायंकाळी टिकेश मडावी हा कोपालगड येथील त्याचा मित्र दिनेश मडावी यांच्या घरी जेवण करायला गेला होता. मुसळधार पाऊस पडत असताना तो आपल्या मित्राच्या घरीच काही वेळ थांबून राहिला. रात्री दहाच्या सुमारास पावसाचा जोर कमी झाला. तेव्हा तो आपल्या स्कुटीने घरी परत येण्यासाठी निघाला . वाटेवर कोपालगड आणि तेलीटोला (जमाकुडो) दरम्यान वाहत असलेल्या नाल्यावरील पुलावरून पाणी वाहत असताना त्याने वाहत्या पाण्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला परंतु पाण्याचा वेग जास्त असल्यामुळे तो स्कुटी सह पुरात वाहून गेला. इकडे रात्री उशिरापर्यंत घरी पोहचला नाही म्हणून टिकेशच्या घरच्या लोकांनी त्याच्या मित्राच्या घरी कोपालगड येथे फोन केला. त्यांनी एक तासाआधीच घरी जाण्यासाठी निघून गेल्याचे सांगितले. तेव्हा वडील शंकरलाल मडावी आणि परिवातील लोक त्याचा शोध घेण्यासाठी निघाले. रात्री उशिरापर्यंत शोध घेतल्यावर पुलापासून दोन किलोमीटर अंतरावर टिकेश मडावी यांचा मृतदेह सापडला. 
सालेकसा पोलीसांनी घटनेची नोंद घेत मर्ग दाखल केला . सालेकसा येथे उत्तरीय तपासणी करून मृतदेह कुटुंबीयांना सुपूर्द करण्यात आले. आपल्या मागे दोन मुलं आणि पत्नी आई-वडील आहेत

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

गोव्यातील ICAR-CCARI संस्थेला देशातील सर्वोच्च कृषी सन्मान, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले शास्त्रज्ञांचे अभिनंदन गोव्यातील ICAR-CCARI संस्थेला देशातील सर्वोच्च कृषी सन्मान, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले शास्त्रज्ञांचे अभिनंदन
आधुनिक केसरी न्यूज पणजी : २४ जुलै २०२५: गोव्यातील आघाडीची कृषी संशोधन संस्था ICAR–सेंटरल कोस्टल अ‍ॅग्रीकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट (CCARI) हिला...
25 जुलै रोजी जिल्ह्यातील शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
एसटी व मोटरसायकलच्या अपघातात महिला ठार
25-26 जुलै दरम्यान विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज,चंद्रपूर जिल्ह्याला रेड अलर्ट
मित्राच्या घरून परततांना शिक्षकाचा पुरात वाहून मृत्यू अन गावावर शोककळा...!
वरोडा नगर परिषदेला कायमस्वरूपी मुख्याधिकारी द्या
कुंभार पिंपळगावात सराफा दुकानावर चोरट्यांचा डल्ला,लाखो रूपयांचे दागिने लंपास चोरटे जोमात; पोलिस प्रशासन कोमात