गोव्यातील ICAR-CCARI संस्थेला देशातील सर्वोच्च कृषी सन्मान, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले शास्त्रज्ञांचे अभिनंदन
आधुनिक केसरी न्यूज
पणजी : २४ जुलै २०२५: गोव्यातील आघाडीची कृषी संशोधन संस्था ICAR–सेंटरल कोस्टल अॅग्रीकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट (CCARI) हिला राष्ट्रीय कृषी विज्ञान पुरस्कार २०२५ (Rashtriya Krishi Vigyan Puraskar) प्राप्त झाला असून, हा भारत सरकारकडून दिला जाणारा कृषी विज्ञान क्षेत्रातील सर्वोच्च राष्ट्रीय सन्मान आहे.ICAR च्या ९७व्या वर्धापन दिनानिमित्त नवी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय कृषी मंत्री श्री. शिवराजसिंह चौहान यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. गोवा आणि किनारपट्टी भागातील हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर शाश्वत शेतीसाठी "Building Coastal Climate Resilience through Integrated Farming Systems and Agro-Ecotourism" या संशोधन प्रकल्पासाठी हा सन्मान देण्यात आला.
डॉ. परवीन कुमार यांच्या नेतृत्वाखाली डॉ. मनोहरा के. के., डॉ. आर. सोलोमन राजकुमार, डॉ. गोपाल रामदास महाजन, डॉ. श्रीकांत जी. बी., आणि डॉ. परमेश वी. या शास्त्रज्ञांच्या पथकाने किनारी भागातील शेतकऱ्यांसाठी मीठ सहन करणाऱ्या पिकांच्या जाती, जैविक खतं, समाकलित शेती मॉडेल, आणि भारतातील पहिले ICAR मान्यताप्राप्त कृषी-पर्यटन मॉडेल तयार केले आहे.
या संशोधनामुळे हजारो शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले असून, अनेक नवउद्योजकांना स्टार्टअपद्वारे आधार मिळाला आहे. या कामगिरीमुळे गोव्यातील कृषी संशोधनाला राष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळाली आहे.मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी अलीकडेच एका सार्वजनिक कार्यक्रमात या शास्त्रज्ञांचे अभिनंदन करताना म्हटले,
"गोव्यासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. ICAR-CCARI चे संशोधन केवळ पुरस्कारास पात्र नाही, तर शेतकऱ्यांच्या जीवनात खऱ्या अर्थाने बदल घडवणारे आहे."हा सन्मान गोव्यातील वैज्ञानिकांना राष्ट्रीय स्तरावर अधोरेखित करतो आणि हवामाननुकूल, शाश्वत शेतीकडे राज्याची वाटचाल अधोरेखित करतो.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List