IMA, महाराष्ट्र राज्य च्या10 जुलै 2025 च्या संपाबाबत तातडीचा निर्णय

IMA, महाराष्ट्र राज्य च्या10 जुलै 2025 च्या संपाबाबत तातडीचा निर्णय

आधुनिक केसरी न्यूज

चंद्रपूर : आज दिनांक 10 जुलै 2025 रोजी रात्री *मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस* यांच्याशी वर्षा बंगल्यावर* तातडीची आणि सकारात्मक बैठक झाली. ही बैठक *मा. सुधीरभाऊ मुनगंटीवार* यांच्या सहकार्याने आणि *डॉ. मंगेश गुलवाडे* यांच्या पुढाकाराने घडून आली.या बैठकीस *IMA महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ. संतोष कदम, सचिव डॉ. अनिल आव्हाड, डॉ. शिवकुमार उत्तुरे व डॉ. मंगेश गुलवाडे* उपस्थित होते.

*मा. मुख्यमंत्री महोदयांनी आयएमए निवेदन गांभीर्याने ऐकून घेतले व तत्काळ मुख्य सचिव श्री. धीरजकुमार तसेच MMC प्रशासक डॉ. विंकी रुघवानी यांच्याशी संपर्क साधत उद्या सकाळी यावर तातडीची बैठक घेण्याचे आदेश दिले.*

या सकारात्मक दृष्टीकोनाची दखल घेत, *IMA महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीची तातडीची बैठक घेऊन सर्वानुमते 11 जुलै 2025 रोजीचा आरोग्य सेवा बंद आंदोलन (संप) पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे आंदोलन मागे घेतलेले नाही तर , फक्त पुढे ढकलण्यात आले आहे.सरकारने दिलेल्या आश्वासनानुसार योग्य कृती झाली नाही तर पुढील आंदोलनाची घोषणा केली जाईल.* असे आय एम ए द्वारे आज प्रसारित केलेल्या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

अंगणवाडी भरती प्रकरणी आ.हिकमत उढाण यांची लक्षवेधी;सीडीपीओ तात्काळ निलंबित  अंगणवाडी भरती प्रकरणी आ.हिकमत उढाण यांची लक्षवेधी;सीडीपीओ तात्काळ निलंबित 
आधुनिक केसरी न्यूज घनसावंगी : तालुक्यात राबविण्यात आलेल्या अंगणवाडी भरती प्रकरणी येथील महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी काही महिलांकडून...
IMA, महाराष्ट्र राज्य च्या10 जुलै 2025 च्या संपाबाबत तातडीचा निर्णय
देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी जन सुरक्षा विधेयक महत्वाचे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
संस्कारक्षम विद्यार्थी घडविणे हेच गुरुचे कर्तव्य : जिल्हाधिकारी दिलीप स्वामी
ब्रह्मपुरी तालुक्यात 10 जुलै रोजी शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
ट्रॅव्हल्स चे धडकेत पिकअप मधील माशांचा समृद्धीवर पाऊस
सततच्या पावसामुळे वरोडा तालुक्यातील अनेक मार्ग बंद