रागाच्या भरात  पोटात खूपसला खंजीर; पोलीसांनी केला गुन्हा दाखल

रागाच्या भरात  पोटात खूपसला खंजीर; पोलीसांनी केला गुन्हा दाखल

आधुनिक केसरी न्यूज

वसमत : उसने दिलेले एक हजार रुपये मागितल्यावरून दोघात वाद झाला. या वादातून शिवीगाळ करत जिवे मारण्याच्या उद्देशाने एकाच्या पोटात चाकू भोसकल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्री ९ वाजे दरम्यान घडली. जखमीस उपचारासाठी नांदेड येथे पाठवण्यात आले आहे. याप्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहरा लगत असलेल्या चंदगव्हाण येथील इर्शाद शेख दाऊद (रा. चंदगव्हाण) याने शहरातील शेख असीम शेख कलीमोद्दीन बीडकर (रा. दर्गा मोहल्ला, वसमत) यास काही दिवसांपूर्वी एक हजार रुपये उसने दिले होते. उसने दिलेले पैसे इर्शादन असीम यास मागितले. यावरुन ८ जुलै रोजी रात्री ९ वाजेदरम्यान दोघांत वाद झाला. या वादातून असीमने इर्शाद यास शिवीगाळ करत चाकूने पोटावर वार केले. यात इर्शाद शेख हा गंभीर जखमी झाला. गंभीर जखमी इर्शाद यास नागरिकांनी उपचारासाठी शहरातील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. परंतु प्रकृती गंभीर असल्याने त्यास पुढील उपचारासाठी नांदेड येथे पाठविण्यात आले आहे. या घटनेची माहिती ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन बोराटे यांना कळताच घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. याप्रकरणी गंभीर जखमी इर्शादचा भाऊ मौलाना शेख दाऊद यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शेख असीम बीडकर याच्याविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणाचा तपास सपोनि गजानन बोराटे, फौजदार एकनाथ डक, भगवान आडे, अजय पंडित करत आहेत.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

शनि शिंगणापूर देवस्थानमधील आर्थिक अनियमिततेबाबत दोषींवर फौजदारी गुन्ह्यांचे आदेश : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनि शिंगणापूर देवस्थानमधील आर्थिक अनियमिततेबाबत दोषींवर फौजदारी गुन्ह्यांचे आदेश : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
आधुनिक केसरी न्यूज संतोष पाटील अहिल्यानगर : जिल्ह्यातील शनि शिंगणापूर देवस्थानमध्ये आर्थिक अनियमितता आणि गैरव्यवहार झाल्याचे धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून आलेल्या...
भोकर तालुका काँग्रेसचे  अध्यक्ष भाजपाच्या गळाला..!
कोबऱ्याची मस्ती जीवावर बेतली; गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील एका तरुणाचा कोबऱ्याच्या दंशामुळे मृत्यू..!
गोंदियात वेश्याव्यवसाय चालविणा-या दोघांना अटक..!
अनुदान घोटाळ्यातील भ्रष्टाचारी अधिकारी व कर्मचाऱ्यांची मालमत्ता जप्त करुन फौजदारी गुन्हे दाखल करा
खासदार नीलेश लंके यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण
रागाच्या भरात  पोटात खूपसला खंजीर; पोलीसांनी केला गुन्हा दाखल