भोकर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष भाजपाच्या गळाला..!
आधुनिक केसरी न्यूज
भोकर : लवकरच होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीचा तोडावर तालुक्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे.येथील काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष भाजपाच्या संपर्कात असल्याने लवकरच ते काँग्रेसचा " हात " सोडून "कमळ "हाती धरणार असे खात्रीलायक वृत आहे.यामूळे काँग्रेस पक्षाला खिंडार पडणार अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
#भोकर विधानसभा मतदारसंघ हा तसा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात असे मागील लोकसभा निवडणुकीपूर्वी माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देऊन भाजपवाशी झाल्याने जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रात मोठ्या प्रमाणात उलथापालथ झाली. राजकीय क्षेत्रातील प्रगल्भ अनूभवी आणि संघटण कौशल्य असलेला लोकनेता भाजपाला मिळाला.दरम्यान जिल्ह्यातील इतर पक्षाचे माजी मंत्री,आमदार, नगरसेवक, सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, चेअरमन, सभापती, उपसभापती याचे भाजपात "ईनकमींग" सूरू झाल्याने पक्षाला चार हत्तीच बळ मिळाल. त्यापाठोपाठ आता येथील काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गोविंद बाबा गौड पाटील यांचा मागील दोनतीन दिवसा पासून भाजपाचा संपर्क वाढला आहे. नांदेड येथे खासदार अशोक चव्हाण यांची श्री.गौड यांनी भेट घेतली असुन पक्षप्रवेशा बाबत चर्चा झाल्याची खात्रीलायक माहिती आहे.
यापूर्वी तालुक्यातील माजी जिल्हा परिषद सदस्य तथा सभापती प्रकाश देशमुख भोसीकर, ओबीसी समाजाचे नेते नामदेव आयलवाड यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजपात प्रवेश केला.
दूसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी तालुक्यात पक्षाची पायमुळ घट्ट रोवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. जिल्हा मध्यवर्ती बँक,बाजार समितीचे संचालक, जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती बाळासाहेब पाटील रावणगावकर,माजी उपसभापती सूरेश बिल्ले वाड, माजी नगरसेवक जवाद बरबडेकर,शेख वकील खैराती यांच्या सह अन्य पदाधिका-यानी पक्षात प्रवेश केला आहे.नव्हे तर बाळासाहेब पाटील रावणगावकर यांना जिल्हा अध्यक्ष पद बहाल करण्यात आले आहे.शिवसेना ऊबाठा गट, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट), वंचीत बहूजन आघाडी चा फारसा प्रभाव नसला तरी ते निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचे समजते.
#आमची राजकीय ओळख असल्याने मी चहापान घेण्यासाठी खासदार अशोक चव्हाण यांची नुकतीच भेट घेतली आहे. अद्याप पक्षप्रवेशाचा निर्णय झाला नाही भविष्यात काय होईल हे आताच स्पष्ट सांगता येणार नाही.
(भोकर तालूका काग्रेस अध्यक्ष:गोविंद बाबा गौड) पाटील.)
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List