शक्तिपीठ महामार्गाच्या प्रकल्पासाठी पैसे दिले जातात ,पण शेतकरी कर्जमाफीसाठी पैसे नाही का?

स्थगन प्रस्तावात काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांचा सरकारला सवाल

शक्तिपीठ महामार्गाच्या प्रकल्पासाठी पैसे दिले जातात ,पण शेतकरी कर्जमाफीसाठी पैसे नाही का?

आधुनिक केसरी न्यूज

मुंबई : दि.२ राज्यात शेतकरी आत्महत्या वाढत आहे. दररोज शेतकरी आत्महत्या होत आहे.राज्यात यावर्षी जानेवारी ते मार्च या कालावधीत  ७६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या.यातील २०० प्रकरणे अपात्र ठरली असून १९४ प्रकरणांची चौकशी प्रलंबित आहे. एकीकडे शेतकरी आत्महत्या होतात त्यांना मदती ही सरकार देत नाही.शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी आज विधानसभेत स्थगन प्रस्ताव दिला होता. कृषिमंत्री शेतकऱ्यांना भिकारी म्हणतात, माजी मंत्री बबनराव लोणीकर शेतकऱ्यांविरोधात आक्षेपार्ह विधान करतात आणि त्यांचा अपमान करतात. शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळत नाही.सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाही ,कापसाला भाव मिळालेले नाही. सरकारने शेतकऱ्यांच्या मालाला दीडपट भाव देऊ असे आश्वासन दिले होते. निवडणुकीआधी कर्जमाफी करू अशी घोषणा केली होती आता मात्र सरकार समितीला पुढे करत आहे. शेतकरी कर्जमाफीसाठी समिती नको अशी भूमिका विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत मांडली. 

शक्तिपीठ महामार्गाच्या प्रकल्पासाठी सरकार २० हजार कोटी मंजूर करतात पण शेतकरी कर्जमाफीसाठी पैसे नाहीत का? असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था बिकट आहे. नांगराला बैल जुंपण्याचा खर्च परवडत नाही म्हणून लातूरमधील एका 65 वर्षीय अंबादास पवार या शेतकऱ्याने बैलाऐवजी स्वतःला नांगराला जुंपलं. त्यामुळे सर्व कामकाज बाजूला ठेवून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करावी अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते वडेट्टीवार यांनी केली.

अध्यक्षांनी स्थगन प्रस्ताव फेटाळल्यामुळे विरोधक आक्रमक झाले, शेतकरी प्रश्नावर सरकार असंवेदनशील आहे, चर्चा टाळत असल्याने सरकारचा निषेध करत विरोधकांनी सभागृहाचा बहिष्कार केला.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

महिला किर्तनकार यांचे हत्येचा गुन्हा उघडकीस; दोन आरोपी जेरबंद..! महिला किर्तनकार यांचे हत्येचा गुन्हा उघडकीस; दोन आरोपी जेरबंद..!
आधुनिक केसरी न्यूज वैजापूर : दि.२७ जून रोजी पोस्टे विरगांव हददीतील मौजे चिंचडगाव शिवारात शेत गट नंबर ५९ मध्ये असलेल्या...
वसमत मध्ये काॅंग्रेसला धक्का; डॉ.क्यातमवार शिंदे सेनेत सामील
अजित पवारांनी विरोधकांचा असा घेतला समाचार..!
राज्यात वीज पडून मृत झालेले शेतकरी, शेतमजूर यांना १० लाख रुपयांची मदत देण्यात यावी ; काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवर यांची मागणी..!
शक्तिपीठ महामार्गाच्या प्रकल्पासाठी पैसे दिले जातात ,पण शेतकरी कर्जमाफीसाठी पैसे नाही का?
अंबाडी घाटात बस व बोलेरो च्या भीषण अपघातात एक ठार
नरेंद्र मोदी भाजपा व बबनराव लोणीकरांचे बाप असू शकतात शेतकऱ्यांचे नाही: नाना पटोले