वसमत मध्ये काॅंग्रेसला धक्का; डॉ.क्यातमवार शिंदे सेनेत सामील
आधुनिक केसरी न्यूज
वसमत : काॅंग्रेसला धक्का बसला असुन काॅंग्रेसचे खंदे समर्थक , जिल्हा पातळीवर विविध पदे भुषवलेले डॉ मारोती क्यातमवार यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे यांच्या वर विश्वास ठेवत, कळमनुरीचे आमदार श्री संतोष बांगर, वसमतचे तालुका प्रमुख राजु दादा चापके यांच्या उपस्थितीत मुंबई येथे शिवसेनेत प्रवेश केला आहे. या आउटगोइंग मुळे वसमत मध्ये काॅंग्रेस आणखीन कमकुवत झाली असुन याचे पडसाद येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये दिसुन येतील. डॉ मारोती क्यातमवार हे मागील वीस वर्षे पासुन काॅंग्रेसचे कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या वर पक्षाने अनेक जबाबदाऱ्या सोपवल्या व त्यांनी यशस्वी करुन दाखवल्या आहेत. अत्यंत संयमी व संवेदनशील असलेले डॉ क्यातमवार हे पद्मशाली समाजाचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष आहेत. आपल्या वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून त्यांनी गोरगरीब जनतेला मोठ्या प्रमाणावर आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या त्यामुळे वसमत मध्ये त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे.या पक्षप्रवेशामुळे शिवसेनेला लाभ तर काॅंग्रेसला नुकसान होईल अशी चर्चा आज वसमत येथील नागरिकांमध्ये आहे.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List