नांदेड येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंत्यांच्या  कार्यालयात 

परभणी येथील मनसेच्या जिल्हा संघटकांचा अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न 

नांदेड येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंत्यांच्या  कार्यालयात 

आधुनिक केसरी न्यूज 

नांदेड : परभणी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता कोरे यांच्या कार्यालयातील वातानुकुलीत यंत्र काढण्यास टाळाटाळ करत असल्याच्या कारणावरून परभणी येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जिल्हा संघटकांनी अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. सदरील घटना ९ मार्च रोजी दुपारी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंता रुपा राऊळ मिरासे यांच्या कार्यालयात घडली आहे. दरम्यान सदरील घटनेमुळे मुख्य अभियंता यांच्या कार्यालयात खळबळ माजली असून अनेक अधिकारी व कर्मचारी यांनी कार्यालय सोडून पळ काढला आहे. 

परभणी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता कोरे यांच्या कार्यालयात नियमबाह्य रित्या वातानुकूलित यंत्र बसविण्यात आले होते. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात बसविण्यात आलेले वातानुकुलीत यंत्र काढून टाकण्यात यावे तसेच कार्यकारी अभियंता कोरे यांना परभणी येथील कार्यालयात हजर राहण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर कारवाई करावी म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे परभणी जिल्हा संघटक श्रीनिवास लाहोटी हे गेल्या १ वर्षांपासून अधिक्षक अभियंता, मुख्य अभियंता यांच्या कार्यालयात तक्रारी करत होते. जिल्हा संघटक श्रीनिवास लाहोटी यांनी अनेक वेळा अधिक्षक अभियंता व मुख्य अभियंता यांची भेट घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. कार्यकारी अभियंता कोरे यांना त्यांच्या कार्यालयातील वातानुकुलीत यंत्र काढण्याचे लेखी आदेश देऊन देखील कोरे यांनी वरिष्ठांचे आदेश डावलून वातानुकुलीत यंत्र तसेच ठेवले होते. तसेच वरिष्ठ अधिकारी सुद्धा त्यांच्या कार्यालयात नियमबाह्य रित्या वातानुकूलित यंत्र बसविले आहेत. त्यामुळे माझ्यावर कारवाई करण्याची नाही अशी भाषा करत होते. 
९ मार्च रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे परभणी जिल्हा संघटक श्रीनिवास लाहोटी हे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंता यांच्या कार्यालयात सकाळी दाखल झाले. त्यांनी संबंधित विभागाचे अधिकारी कोठे गेले, कार्यकारी अभियंता यांच्या विरोधात कारवाई करत नाहीत असे म्हणत त्यांनी मुख्य अभियंता यांच्या कार्यालयातच त्यांनी अंगावर पेट्रोल ओतून आग लावण्याचा प्रयत्न करत असताना कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी त्यांच्या हातातील पेट्रोल व इतर साहित्य ताब्यात घेतले. सदरील घटना शिवाजीनगर पोलिसांना समजताच ते तातडीने घटनास्थळी दाखल झाले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे परभणी जिल्हा संघटक श्रीनिवास लाहोटी यांना ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात घेऊन गेले.  सदरील प्रकार हा भाग्यनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडला असल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे परभणी जिल्हा संघटक श्रीनिवास लाहोटी यांना भाग्यनगर पोलिसांच्या हवाली केले. सदरील घटनेमुळे मुख्य अभियंता यांच्या कार्यालयात घडलेल्या घटनेमुळे खळबळ उडाली असून अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कार्यालय सोडून इतरत्र पळ काढला आहे. 

कार्यालयात हजर राहण्यासाठी पत्रव्यवहार
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे परभणी जिल्हा संघटक श्रीनिवास लाहोटी यांनी माध्यमांशी बोलताना म्हणाले की, कार्यकारी अभियंता कोरे यांनी त्यांच्या कार्यालयातील नियमबाह्य रित्या बसविण्यात आलेले वातानुकुलीत यंत्र काढावे व त्यांना कार्यालयात हजर राहावे म्हणून पत्रव्यवहार केला. परंतु दखल घेतली नसल्यामुळे हा प्रकार घडला असल्याचे सांगितले. आज मला पोलिसांनी ताब्यात घेतले असले तरी माझ्यावर कोणताही गुन्हा दाखल झाला तरी मी माघार घेतली नसल्याचे त्यांनी सांगितले.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

भीम जयंती मिरवणुकीत वाहन घुसल्याने एकाचा मृत्यू.एक जखमी भोकर येथील घटणा भीम जयंती मिरवणुकीत वाहन घुसल्याने एकाचा मृत्यू.एक जखमी भोकर येथील घटणा
आधुनिक केसरी न्यूज  भोकर :  रविवारी ( ता.२६) भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती निमित्त मिरवणूक काढण्यात आली होती.रात्री ९...
​गोंदियात उपवर्गीकरणा विरोधात भीमगर्जना, बदर समितीचा अहवाल सार्वजनिक करण्या
तिहेरी खुन प्रकरणातील मुख्य सुत्रधार साई गँगचा सुत्रधार, साई उर्फ साईलाला गहेरवार व  नितेश इंगळे यास वाराणसीत अटक 
Breking News : भ्रष्टाचारी चार आयएएस अधिकाऱ्यांचे प्रकरण उघड करणार : नाना पटोले 
खासदार प्रतिभा धानोरकर यांनी राजमाता राणी हिराई सोहळ्याला गालबोट लावले ; आदिवासी समाजाच्या वतीने तीव्र निषेध
हडसणी फाट्यावर भीषण अपघात, भरधाव कारने दोन दुचाकींना उडवले ४ जण ठार : एकाची प्रकृती चिंताजनक
महिला आरक्षणावर खुल्या चर्चेस काँग्रेस तयार; मुख्यमंत्र्यांनी सांगावे कधी व कुठे चर्चा करायची? मोदींनाही चर्चेला बोलवा: खा. प्रणिती शिंदे