वाढत्या उन्हामुळे शाळा - महाविद्यालये सकाळच्या सत्रात 11 वाजेपर्यंतच ठेवा ; जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी निर्गमित केले आदेश

वाढत्या उन्हामुळे शाळा - महाविद्यालये सकाळच्या सत्रात 11 वाजेपर्यंतच ठेवा ; जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी निर्गमित केले आदेश

आधुनिक केसरी न्यूज 

चंद्रपूर, दि. 19 : जिल्ह्यात सध्या वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. 11 मार्च 2026 रोजी आयोजित बैठकीत शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक), जिल्हा परिषद यांना शाळा सकाळ सत्रात घेण्याबाबत निर्देश देण्यात आले होते.

सध्या चंद्रपूर जिल्ह्यात उन्हाचा तीव्र तडाखा जाणवत असून तापमान 44 अंश सेल्सिअसच्या वर पोहोचले आहे. दिवसेंदिवस उष्णतेची तीव्रता वाढत असल्याने शाळा व महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेषतः उष्माघात (सन स्ट्रोक) व इतर उष्णतेशी संबंधित आजारांचा धोका लक्षात घेता विद्यार्थ्यांची सुरक्षितता अत्यंत महत्त्वाची ठरत आहे.

दुपारच्या कडक उन्हात शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना घरी जाताना होणारा त्रास टाळण्यासाठी जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या (शासकीय, अनुदानित व खासगी) शाळा व महाविद्यालयांच्या वेळांमध्ये तात्पुरता बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार सर्व शैक्षणिक संस्था सकाळच्या सत्रात सुरू करून जास्तीत जास्त सकाळी 11 वाजेपर्यंत सोडण्याबाबत संबंधितांना निर्देश देण्यात आले आहेत.जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या अध्यक्षा वसुमना पंत यांनी या निर्देशांची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्याचे निर्देश दिले आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी दक्षता बाळगावी, असेही त्यांनी नमूद केले आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

चंद्रपूर  जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा चंद्रपूर  जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा
आधुनिक केसरी न्यूज   चंद्रपूर, दि. 19 : भारतीय हवामान विभागाकडून आगामी काळात विदर्भात, विशेष करून चंद्रपूर जिल्ह्यात येणाऱ्या कालावधीत काही...
वाढत्या उन्हामुळे शाळा - महाविद्यालये सकाळच्या सत्रात 11 वाजेपर्यंतच ठेवा ; जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी निर्गमित केले आदेश
खासदारांचे विधान दुर्दैवी व निंदनीय : आ.करण देवतळे
पाचोरा-हडसन रस्त्यावर बिबट्याचा वावर; परिसरातील शेतकरी तसेच मजुरांनी सतर्क रहा!
नूतन विभागीय आयुक्त जी.श्रीकांत यांनी कार्यभार स्वीकारला
नाल्याच्या पाण्यात बडून चार बालके दगावली 
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती निमित्त  "नागसेन - मिलिंद" या तीन दिवशीय व्याख्यानमालेचा आज प्रारंभ..!