पाचोरा-हडसन रस्त्यावर बिबट्याचा वावर; परिसरातील शेतकरी तसेच मजुरांनी सतर्क रहा!

पाचोरा-हडसन रस्त्यावर बिबट्याचा वावर; परिसरातील शेतकरी तसेच मजुरांनी सतर्क रहा!

आधुनिक केसरी न्यूज 

पाचोरा : हडसन पहाण रस्त्यावरील खेडगाव नंदीचे जवळील आमदार किशोर पाटील यांच्या शाळेजवळ तसेच पत्रकार राहुल महाजन यांच्या हॉटेलच्या परिसरात आज सायंकाळी ६:४५ वाजेच्या सुमारास बिबट्याचे दर्शन झाल्याने खळबळ उडाली आहे. हा बिबट्या मादी स्वरूपाचा असून, पत्रकार फकीरचंद पाटील यांनी या बिबट्याला प्रत्यक्ष पाहिल्याची माहिती दिली आहे. महामार्गावर बिबट्याचा वावर आढळून आल्याने शेतात काम करण्यासाठी आलेले मजुरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, परिसरात या घटनेची मोठी चर्चा सुरू आहे. सध्या या घटनेबाबत वनविभाग किंवा प्रशासनाकडून कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नसली तरी, नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्यांनी आणि शेतकरी वर्गाने अधिक सतर्क राहावे. आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीवर लक्ष ठेवावे आणि सुरक्षिततेचे नियम पाळावेत, अशा सूचना देण्यात येत आहेत. प्रशासनाकडून परिस्थितीचा आढावा घेतला जात असून पुढील सूचना मिळेपर्यंत नागरिकांनी शांतता राखावी.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

पाचोरा-हडसन रस्त्यावर बिबट्याचा वावर; परिसरातील शेतकरी तसेच मजुरांनी सतर्क रहा! पाचोरा-हडसन रस्त्यावर बिबट्याचा वावर; परिसरातील शेतकरी तसेच मजुरांनी सतर्क रहा!
आधुनिक केसरी न्यूज  पाचोरा : हडसन पहाण रस्त्यावरील खेडगाव नंदीचे जवळील आमदार किशोर पाटील यांच्या शाळेजवळ तसेच पत्रकार राहुल महाजन...
नूतन विभागीय आयुक्त जी.श्रीकांत यांनी कार्यभार स्वीकारला
नाल्याच्या पाण्यात बडून चार बालके दगावली 
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती निमित्त  "नागसेन - मिलिंद" या तीन दिवशीय व्याख्यानमालेचा आज प्रारंभ..!
सोलार लाईटच्या खांबावरील शाॅट सर्किटमुळे परसराम तांड्यावर आगीचे तांडव 
सातारा येथे नवविवाहितेचा संशयास्पद मृत्यू; निष्पक्ष चौकशीची मागणी
वरोड्यात रवी कमल जिनिंगला भीषण आग; अंदाजे दहा करोड रुपये नुकसानीचा अंदाज