खासदारांचे विधान दुर्दैवी व निंदनीय : आ.करण देवतळे
आधुनिक केसरी न्यूज
चंद्रपूर : ( दि. १८ )आर्णी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार यांनी लोकसभेच्या पटलावर महिलांच्या आरक्षणाबाबत केलेले विधान अत्यंत दुर्दैवी व निंदनीय आहे. महिलांना आरक्षणाची गरज नाही, असे विधान एका महिला खासदाराकडून होणे हे आश्चर्यकारक आहे. भारतीय जनता पक्षाचा महिलांच्या सशक्तीकरणावर ठाम विश्वास आहे. जोपर्यंत महिलांना योग्य प्रमाणात राजकीय प्रतिनिधित्व मिळत नाही, तोपर्यंत खरे महिला सशक्तीकरण होऊ शकत नाही, हे आमचे स्पष्ट मत असल्याचे मत वरोडा भद्रावती विधानसभा निर्वाचन क्षेत्राचे आमदार करण देवतळे यांनी व्यक्त केले आहे. त्यांनी सांगितले की, महिलांना आरक्षण देणे ही केवळ राजकीय बाब नसून सामाजिक न्यायाचा प्रश्न आहे. देशाच्या विकासात महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी आरक्षण अत्यावश्यक आहे.महिलांना समान संधी आणि अधिकार मिळणे हे लोकशाहीचे मूलभूत तत्त्व आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या विधानांचा त्यांनी तीव्र शब्दांत निषेध केला.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List