बंडगार्डन पोलिस ठाण्यातील PSI विरुद्ध लाच मागणीचा गुन्हा; एसीबीची कारवाई

बंडगार्डन पोलिस ठाण्यातील PSI विरुद्ध लाच मागणीचा गुन्हा; एसीबीची कारवाई

आधुनिक केसरी न्यूज 

संदीप शेलार

पुणे : दि.9 मार्च 2026 फसवणुकीच्या तक्रारीत गुन्हा दाखल न करण्यासाठी तक्रारदाराकडे लाखोंची लाच मागितल्याप्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षकाविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. संदीप खेडकर (वर्ग-२), पोलीस उपनिरीक्षक, बंडगार्डन पोलिस ठाणे, असे आरोपी अधिकाऱ्याचे नाव आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे ४० वर्षीय तक्रारदाराविरुद्ध बंडगार्डन पोलिस ठाण्यात फसवणुकीसंदर्भात तक्रार अर्ज दाखल होता. या अर्जाची चौकशी पोलीस उपनिरीक्षक संदीप खेडकर करत होते. या प्रकरणात तक्रारदाराविरुद्ध गुन्हा दाखल न करण्यासाठी त्यांनी तक्रारदाराकडे २ लाख रुपयांची लाच मागितल्याची तक्रार तक्रारदाराने ३ फेब्रुवारी २०२६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती.

या तक्रारीच्या अनुषंगाने लाच मागणीची पडताळणी करण्यात आली. पडताळणीदरम्यान आरोपी पोलीस उपनिरीक्षक संदीप खेडकर यांनी तक्रारदार व त्यांच्या वकिलासमोर पंचासमक्ष तडजोडीअंती १ लाख रुपयांची लाच स्वतःसाठी व वरिष्ठांसाठी मागितल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी आरोपी पोलीस उपनिरीक्षक संदीप खेडकर यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ च्या कलम ७ व ७(अ) अन्वये बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस उपआयुक्त तथा पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे परिक्षेत्र) यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक अजीत पाटील व अर्जुन भोसले यांच्या नेतृत्वात करण्यात आली. तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त निता मिसाळ यांनी सापळा कारवाई केली असून पोलीस निरीक्षक प्रविण निबांळकर हे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

शिकारच्या शोधात वाघाचा विहीरीत पडून मृत्यू शिकारच्या शोधात वाघाचा विहीरीत पडून मृत्यू
आधुनिक केसरी न्यूज  गोंदिया : शिकार व पाण्याच्या शोधात शेतशिवारात आलेल्या ४ ते ५ वर्षीय वाघाचा शेतातील कठडे नसलेल्या विहीरीत...
गुरुनिष्ठेचं सर्जनशील दर्शन घडवणारा ग्रंथ : प्रा. डॉ. कैलास अंभुरे
आशाताईंच्या सुरांमध्ये निसर्गाची कोमलता
मंठा पोलिसांची गावठी हातभट्टीवर मोठी कारवाई : ८० हजारांचा मुद्देमाल जप्त, हजारो लिटर हातभट्टी दारू नष्ट
सप्तसुरांवर अधिराज्य गाजवणाऱ्या आशाताई भोसले यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद : विजय वडेट्टीवार 
चतुरस्त्र सूर हरपला; आ.सुधीर मुनगंटीवार यांची आशाताई भोसले यांच्या निधनाबद्दल हृदयस्पर्शी शोकसंवेदना
संगीताच्या इतिहासातील सुवर्ण अध्याय संपला : आ. किशोर जोरगेवार