बाफना टी पॉईंट येथे आग : ३ वाहने जळून खाक

बाफना टी पॉईंट येथे आग : ३ वाहने जळून खाक

आधुनिक केसरी न्यूज 

नांदेड : शहरातील बाफना टी पॉईंट येथील डेंटिंग पेंटिंगच्या दुकानात शनिवारी पहाटे अचानक आग लागली असून या भिषण आगीत दुरुस्तीसाठी आलेली ३ चार चाकी वाहने जळून खाक झाली आहेत.  दरम्यान तातडीने घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाने अन्य ४ वाहने आगीमधून सुरक्षित बाहेर काढली आहेत. शहरातील वाफना टी पॉईंट परिसरात वाहने दुरूस्तीची अनेक दुकाने आहेत. यातील डेंटिंग पेंटिंगच्या एका दुकानात शनिवारी पहाटे २.१० च्या सुमारास अचानक आग लागली. काही वेळात या आगीने भीषण रुप धारण केले होते.  पेट्रोलिंग करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांनी ही माहिती महापालिकेच्या अग्निशमन विभागास दिली. तेव्हा तत्परता दाखवून अग्निशमन विभागाचे अधिकारी

केरोजी दासरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने  वाहनासह घटनास्थळी दाखल झाले व आग विझविण्यास सुरुवात केली. यावेळी कर्मचाऱ्यांनी तत्परता दाखवत सदरील तिन्ही वाहनांची आग विझवली, मात्र सदर वाहने जळून खाक झाल्याने मोठे नुकसान झाले. या आगीमध्ये स्कोड, मारुती स्विफ्ट व महिंद्रा एक्स युव्ही, ही वाहने जळाली. तर आगीपासून मर्मा-हंद्रा पिकअप, होंडा सिटी, टाटा इंडिका व महिंद्रा या अन्य ४ वाहनांचा अग्निशमनच्या टिमने आगीपासून वचाव केला, असे दुकान मालक तोफिक पठाण यांनी सांगीतले. दरम्यान आग कशामुळे लागली ते समजू शकले नाही. या कारवाईत अग्निशमन अधिकारी के. एस. दासरे, उपअग्निशमन अधिकारी निलेश कांवळे, सावळे, लांडगे, नरवाडे, शिंदे वाहन चालक टारपे यांनी सहभाग घेतला.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

भीम जयंती मिरवणुकीत वाहन घुसल्याने एकाचा मृत्यू.एक जखमी भोकर येथील घटणा भीम जयंती मिरवणुकीत वाहन घुसल्याने एकाचा मृत्यू.एक जखमी भोकर येथील घटणा
आधुनिक केसरी न्यूज  भोकर :  रविवारी ( ता.२६) भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती निमित्त मिरवणूक काढण्यात आली होती.रात्री ९...
​गोंदियात उपवर्गीकरणा विरोधात भीमगर्जना, बदर समितीचा अहवाल सार्वजनिक करण्या
तिहेरी खुन प्रकरणातील मुख्य सुत्रधार साई गँगचा सुत्रधार, साई उर्फ साईलाला गहेरवार व  नितेश इंगळे यास वाराणसीत अटक 
Breking News : भ्रष्टाचारी चार आयएएस अधिकाऱ्यांचे प्रकरण उघड करणार : नाना पटोले 
खासदार प्रतिभा धानोरकर यांनी राजमाता राणी हिराई सोहळ्याला गालबोट लावले ; आदिवासी समाजाच्या वतीने तीव्र निषेध
हडसणी फाट्यावर भीषण अपघात, भरधाव कारने दोन दुचाकींना उडवले ४ जण ठार : एकाची प्रकृती चिंताजनक
महिला आरक्षणावर खुल्या चर्चेस काँग्रेस तयार; मुख्यमंत्र्यांनी सांगावे कधी व कुठे चर्चा करायची? मोदींनाही चर्चेला बोलवा: खा. प्रणिती शिंदे