माओवादी चळवळीला मोठा धक्का? वरिष्ठ नेता ‘गणपती’ नेपाळमध्ये ताब्यात असल्याची चर्चा

माओवादी चळवळीला मोठा धक्का? वरिष्ठ नेता ‘गणपती’ नेपाळमध्ये ताब्यात असल्याची चर्चा

आधुनिक केसरी न्यूज 

जगदलपूर : देशातील माओवादी चळवळीच्या नेतृत्वाशी संबंधित मोठी बातमी समोर येत असून, माओवादी संघटनेचा वरिष्ठ नेता आणि माजी महासचिव म्हणून ओळखला जाणारा मुप्पला लक्ष्मण राव उर्फ ‘गणपती’ नेपाळमध्ये सुरक्षा यंत्रणांच्या ताब्यात असल्याची माहिती सूत्रांकडून पुढे येत आहे. या वृत्तामुळे माओवादी संघटनेत मोठी खळबळ उडाल्याचे सांगितले जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नेपाळमधील सुरक्षा यंत्रणांनी गुप्त कारवाई करत त्याला ताब्यात घेतल्याची चर्चा सुरू आहे. त्यानंतर त्याला भारतात आणण्याच्या हालचालीही सुरू झाल्याचे समजते. मात्र या संदर्भात अधिकृत पातळीवर अद्याप कोणतीही स्पष्ट पुष्टी करण्यात आलेली नाही.

गणपती हा अनेक वर्षे माओवादी चळवळीतील महत्त्वाचा रणनीतिकार मानला जात होता. छत्तीसगड, महाराष्ट्र, झारखंड, ओडिशा, आंध्रप्रदेश आणि बिहार या राज्यांमध्ये संघटनेचा प्रभाव वाढविण्यात त्याची भूमिका असल्याचे सुरक्षा यंत्रणांचे मत आहे. त्यामुळे त्याच्या संभाव्य अटकेची बातमी समोर येताच माओवादी संघटनांमध्ये अस्वस्थता निर्माण झाल्याची चर्चा आहे. गेल्या अनेक दशकांपासून भूमिगत राहून संघटनेचे नेतृत्व करणाऱ्या गणपतीवर विविध राज्यांमध्ये गंभीर गुन्हे नोंद असल्याचे सांगितले जाते. त्याच्यावर मोठ्या रकमेचे बक्षीसही जाहीर करण्यात आले होते. दरम्यान, जर त्याच्या ताब्याबाबत अधिकृत दुजोरा मिळाला, तर माओवादी चळवळीला हा मोठा धक्का मानला जाईल, असे सुरक्षा क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

शिकारच्या शोधात वाघाचा विहीरीत पडून मृत्यू शिकारच्या शोधात वाघाचा विहीरीत पडून मृत्यू
आधुनिक केसरी न्यूज  गोंदिया : शिकार व पाण्याच्या शोधात शेतशिवारात आलेल्या ४ ते ५ वर्षीय वाघाचा शेतातील कठडे नसलेल्या विहीरीत...
गुरुनिष्ठेचं सर्जनशील दर्शन घडवणारा ग्रंथ : प्रा. डॉ. कैलास अंभुरे
आशाताईंच्या सुरांमध्ये निसर्गाची कोमलता
मंठा पोलिसांची गावठी हातभट्टीवर मोठी कारवाई : ८० हजारांचा मुद्देमाल जप्त, हजारो लिटर हातभट्टी दारू नष्ट
सप्तसुरांवर अधिराज्य गाजवणाऱ्या आशाताई भोसले यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद : विजय वडेट्टीवार 
चतुरस्त्र सूर हरपला; आ.सुधीर मुनगंटीवार यांची आशाताई भोसले यांच्या निधनाबद्दल हृदयस्पर्शी शोकसंवेदना
संगीताच्या इतिहासातील सुवर्ण अध्याय संपला : आ. किशोर जोरगेवार