अंबाडी घाटात बस व बोलेरो च्या भीषण अपघातात एक ठार
रस्त्याच्या दुतर्फा वाढलेल्या गर्द झाडी कडे किनवट वन विभागाचे दुर्लक्ष
आधुनिक केसरी न्यूज
लक्ष्मीकांत मुंडे
किनवट : तीर्थक्षेत्र उनकेश्वरकडून सकाळी किनवटकडे येणाऱ्या किनवट आगाराच्या बसगाडीची क्रं. एम. एच. ४१ - बी. टी. २१०५ आणि किनवटकडून आदिलाबाद- कडे जाणाऱ्या बोलोरो जिप क्र. ए.पी. ०२ - बी.डी. ६६६९ या दोन वाहनांची समोरासमोर अंबाडी घाटात धडक होऊन त्यात पपु गंगुलप्पा रा. चित्तूर आंध्रप्रदेश येथिल हा बोलेरो चालक ठार झाला. या जोरदार धडकेत बसगाडीतील प्रवासी मात्र सुखरुप आहेत.
ही घटना आज (मंगळवार) सकाळी घडली आहे. किनवट बस आगाराची बसगाडी ही उनकेश्वर येथे रात्री मुक्कामी होती. १ जुलै रोजी सकाळी किनवटकडे येत असतांना अंबाडी घाटात रस्त्याच्या दुतर्फा अनावश्यक वाढलेल्या झाडांच्या फांद्यामुळे रस्त्याचा अंदाज न लागल्याने किनवटकडून आदिलाबादकडे जाणाऱ्या बोलेरो गाडीची समोरासमोर जोराची धडक झाली. त्यात बोलेरो चालक पप्पू गंगुलप्पा हा स्टेरींगमध्ये अडकला. त्या ठिकाणी किमान दोन तास त्या ड्रायव्हरला काढायला कुणीही तयार नसताना अगदी वेळेवर किनवट पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चोपडे, पत्रकार प्रमोद पोहरकर व बस आगारातील ड्रायव्हर गजानन चंद्रे यांनी काही लोकांच्या मदतीने पथक प्रयत्न करून बाहेर काढले व उपचारासाठी त्यास गंभीर जखमी अवस्थेत आदिलाबाद येथे पाठविण्यात आले पण वाटेतच त्याची प्राणज्योत मालवली. पप्पू चा किनवट येथे रोपवाटिकेचा व्यवसाय होता विशेष म्हणजे या अपघातात बस गाडी मधील एकाही प्रवाशाला धक्का लागलेला नाही.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List