पक्षश्रेष्ठींच्या आदेशानंतर अखेर साक्री नगराध्यक्षांचा राजीनामा नाराजी नाट्य दूर;भाजप एकजुट असल्याचा दिला संदेश
आधुनिक केसरी न्यूज
चंद्रशेखर अहिरराव
साक्री : शहर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षांविरोधात सत्ताधारी भाजपातीलच सहा नाराज नगरसेवकांनीच अविश्वास ठराव आणल्याने शहराचे राजकारण ढवळून निघाले होते.नाराज नगरसेवकांना विरोधकांनीही साथ देत नगरपंचायतीत सत्ता मिळविण्याचे मनसुबे आखले होते.नगराध्यक्षांवरील अविश्वास ठरावावर ४ जुलैला बैठकही होणार होती. परंतु,तत्पूर्वीच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज सकाळी साक्री नगराध्यक्षांसह सर्व भाजप नगरसेवकांना मुंबईत बोलवून बैठक घेतली.तसेच नाराजांची समजूत घालतानाच नगराध्यक्षांसह स्वीकृत सदस्यांचा राजीनामा घेतला. त्यामुळे नाराज असलेल्या भाजप नगरसेवकांनी नाराजीची तलवार म्यान केली. यावेळी भाजप एकजुटीचा विजय असो... च्या घोषणा देण्यात आल्या. एकंदरित शिंदेसेनेचा राजकीय डाव उधळून लावत भाजपाने नगरपंचायतच्या सत्ता संघर्षाला पुर्णविराम दिला आहे.
मुंबईत आज सकाळी ११ वाजता झालेल्या बैठकीस भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे,धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल, आ.अमरिशभाई पटेल,आ.अनुप अग्रवाल,आ.काशिराम पावरा,आ.राजेश पाडवी,प्रदेश महामंत्री विजय चौधरी,माजी जि.प.सदस्य हर्षवर्धन दहिते,भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष चंद्रजीत पाटील,विजय भोसले, भाजपा उपजिल्हाध्यक्ष बापूसाहेब खलाणे,भाजपाचे ग्रामीण सरचिटणीस शैलेश आजगे,माजी जिल्हाप्रमुख बबन चौधरी,नगराध्यक्षा जयश्री पवार,उपनगराध्यक्ष बापू गिते यांच्यासह भाजपाचे सर्व नगरसेवक व
यामुळे रंगला होता सत्तासंघर्ष!
साक्री नगरपंचायत नगराध्यक्षांच्या कारभाराविरोधात भाजपाच्या सहा नगरसेवकांनी नाराजी दाखवत शिवसेना आणि काँग्रेसच्या नगरसेवकांना सोबत घेवून अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता.या प्रस्तावावर २५ जून रोजी बैठक होणार होती. परंतु,पीठासीन अधिकाऱ्यांनी बैठकीला दांडी मारल्यामुळे राजकीय वातावरण चिघळले होते.मोर्चा,रास्ता रोको करत वरिष्ठ अधिकाऱ्यांना चर्चेसाठी बोलविण्याचा आग्रह शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख डॉ.तुळशीराम गावीत यांनी धरला होता. त्यानुसार आता ४ जुलैला अविश्वास ठरावावर बैठक होणार होती.तसेच अविश्वास ठरावाविरोधात सर्व १२ नगरसेवक एकजूट असल्याचा दावा विरोधकांनी केला होता. परंतु,तत्पुर्वीच भाजपाने नाराजांची नाराजी दूर करत सत्ता कायम राखण्यात यश मिळविले आहे.त्यामुळे विरोधकांचे मनसुबे उधळले गेले आहेत.
स्वीकृत सदस्य उपस्थित होते. प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनी काढली नाराजांची समजूत ! साक्री नगरपंचायतींच्या सत्ता संघर्षात लोकशाहीचे तत्त्वे जपली पाहिजेत,भाजपा नगरसेवकांनी आपआपसातील वाद स्थानिक पातळीवर मिटवून सत्ता टिकविण्यासाठी एकत्रित राहिले पाहिजे,असा कानमंत्र देत महसूल मंत्री आणि भाजपाचे प्रदेशअध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नाराज नगरसेवकांची समजूत काढली तसेच कानउघाडणीही केली.
नगराध्यक्षांकडून घेतला राजीनामा ! यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नगराध्यक्षा जयश्री पवार, उपनगराध्यक्ष बापू गिते, स्वीकृत सदस्य अॅड. पूनम काकुस्ते-शिंदे यांचा राजीनामा घेतला. तसेच नवीन नगराध्यक्षा आणि उपनगराध्यक्ष, इच्छुकांना 'स्वीकृत' पदी मिळणार संधी !
प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नगराध्यक्षांसोबतच स्वीकृत सदस्यांचेही राजीनामे घेतले आहेत. त्यामुळे त्यांच्या जागी इच्छुकांना संधी मिळणार आहे. पक्षाने ज्यांना आश्वासन दिले त्यांची स्वीकृत नगरसेवकपदी वर्णी लागणार असल्याने इच्छुकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
सभापती यांची निवड प्रक्रिया काही दिवसात घेतली जाणार असल्याचे जाहीर केले. तसेच धुळे जिल्हाधिकाऱ्यांनाही कळविले की, सदर पदाधिकाऱ्यांचे राजीनामे घेतले आहेत. ते मंजूर करुन घ्या. तसेच त्यांनी राजीनामे न दिल्यास पक्ष त्यांच्यावर कारवाई करेल, असे देखील सांगितले. यानंतर सर्व भाजप नगरसेवकांनी 'भाजप एकजुटीचा विजय असो' असा जयघोष केला.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List