खामगाव फाटा येथे मोटरसायकलला जोराची धडक एक ठार एक जखमी..!
आधुनिक केसरी न्यूज
वडोद : फुलंब्री ते. सिल्लोड मार्गावरील खामगाव फाटा येथे कार ने मोटरसायकलला धडक दिल्याने मोटरसायकल वरील एक जण ठार झाला तर एक जण जखमी झाला फुलंब्री कडून सिलोड कडे जाणाऱ्या महिंद्रा कंपनीची कार क्रमांक एम एच 03सी एस 9731ने मोटरसायकल क्रमांक एम एच 20बी एस 6818ला जोराची धडक. दिली मोटरसायकल ला महिंद्रा कंपनीची कार क्रमांक एम एच 03सी एस 9731ने जोराची धडक दिल्याने मोटरसायकल वरील आदित्य भास्कर थोरात. वय 19वर्ष याचा मृत्यु झाला तर यश शामराव दांगोडे वय 19वर्ष गंभीर जखमी झाला या दोघांना रुग्णवाहिकेने फुलंब्री येथील श्री शासकिय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी आदित्य भास्कर थोरात याला तपासून मृत घोषित केले तर यश दांगोडे हा गंभीर जखमी असून त्याला संभाजीनगर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे कारचा धडकेने मोटरसायकल वरील दोन युवक वर उडून खाली पडले तर मोटरसायकलला कारणे हरपटत 200 फूट जवळपास नेले जवळच पोलीस ठाणे असल्यामुळे पोलीस लगेच मदतीसाठी धावून आले यावेळी पोलीस सोनू गायकवाड मालोदे दाभाडे यांनी लगेच घटनास्थळी जखमींना उपचारासाठी रुग्णालयात पाठवले. खामगाव फाटा येथे अपघाताचे प्रमाण वाढले असून या ठिकाणी मोठा( टर्न )वळण रस्ता असल्यामुळे वाहनांचा वेग कमी होत नाही या ठिकाणी सिग्नल बसवण्यात यावे व दोन्ही बाजूने गतिरोधक तयार करण्यात यावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे कारण एका साईडने वडोद बाजार पोलीस ठाणे आहे तर दुसऱ्या साईडने खामगाव हे मोठे गाव आहे रस्त्यावरून जाताना रस्ता ओलांडत असताना मोठी जोखीम पत्करावी लागते व नागरिकांना अपघाताचा मोठा धोका निर्माण होतो तर या ठिकाणी वाहनांची अपघाताची संख्या वाढली आहे. प्रत्येक फाट्यावर वाहनांचा वेग कमी होण्यासाठी सिग्नल बसवण्यात यावे अशी मागणी होत आहे.
About The Author
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List