भीषण... पुन्हा एक पावसाचा बळी! शेतातील माती रस्त्यावर आली, चार चाकी घसरून खाल्ल्या ५ पलट्या ! तरुणाचा जागीच मृत्यू

लोणार भाजप शहराध्यक्षसह तिघे जखमी ; लोणार तालुक्यातील मध्यरात्रीची दुर्घटना..!

भीषण... पुन्हा एक पावसाचा बळी! शेतातील माती रस्त्यावर आली, चार चाकी घसरून खाल्ल्या ५ पलट्या ! तरुणाचा जागीच मृत्यू

आधुनिक केसरी न्यूज

प्रणव वराडे

लोणार : तालुक्यात मध्यरात्री भीषण दुर्घटना घडली. मेहकर लोणार रस्त्यावरील वडगाव तेजन जवळ चार चाकी वाहनाने ५ पलट्या घेतल्या..या भीषण अपघातात १ जण जागीच ठार तर तिघे जखमी झाले. मृतक आणि जखमी चौघेही लोणारचे आहेत.. ते मेहकर वरून लोणार कडे जात होते. ऋषभ बाबुलालजी बगडिया (२६, रा.लोणार) असे अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. भाजप शहराध्यक्ष शुभम बनमेरू यांच्यासह तिघे जखमी असून त्यांच्यावर मेहकर येथे उपचार सुरू आहे. प्राप्त माहितीनुसार एम एच २८, बी. डब्ल्यू ०९५९ क्रमांकाच्या महिंद्रा कंपनीच्या चार चाकी वाहनाने चौघे मित्र मध्यरात्री बाराच्या सुमारास मेहकर वरून लोणार कडे जात होते. काल दिवसभर मेहकर लोणार तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे शेतजमीन खरडून गेली..वडगाव तेजन जवळ शेतातील माती खरडून मुख्य रस्त्यावर आलेली होती.. त्या मातीवर चार चाकी वाहन स्लीप झाले, गाडीने चार ते पाच वेळा पलट्या मारल्या.. या अपघातात ऋषभबाबुलालजी बगडिया याचा मृत्यू तर तिघे जखमी झाले. जखमी व मृतकांना तातडीने मेहकर येथे हलवण्यात आले.. अपघात एवढा भीषण होता की वाहनाचा अक्षरशः चक्काचूर झाला होता..दरम्यान एवढा मोठा वर्दळीचा रस्ता असताना आणि काल रात्री एवढा भीषण अपघात झालेला असताना देखील रस्त्यावरच चिखल यंत्रणे कडून अद्याप हटवलेला नाही. यामुळे आणखी अपघाताची शक्यता नाकारता येत नाही....

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

हिरडव येथील जिल्हा परिषद शाळेची खोली कोसळली..! हिरडव येथील जिल्हा परिषद शाळेची खोली कोसळली..!
आधुनिक केसरी न्यूज  प्रणव वराडे  लोणार : तालुक्यात काल दिनांक २६ जून रोजी सकाळी मुसळधार पाऊसाला सुरुवात झाली. त्यात बऱ्याच...
गावगाड्यातील पत्रकारांच्या प्रमुख मागण्या सभागृहात मांडणार - आमदार सदाभाऊ खोत 
Breaking News... माजी राज्यमंत्री स्व.वामनराव गड्डमवार यांची कन्या,महिला नेत्या,बँकेची माजी संचालक सौ.नंदाताई अल्लुरवार यांचा भाजपात प्रवेश
एसटी ऑटोच्या अपघातात 10 जण जखमी, करडखेड फाट्याजवळील घटना
भीषण... पुन्हा एक पावसाचा बळी! शेतातील माती रस्त्यावर आली, चार चाकी घसरून खाल्ल्या ५ पलट्या ! तरुणाचा जागीच मृत्यू
शेगाव पंढरपूर रोड लगतच्या सुलतानपूर तालुका लोणार येथील लोकांच्या घरामध्ये घुसणाऱ्या पावसाळी पाण्याची उपाययोजना करून विल्हेवाट न लावल्यास "जलसमाधी आंदोलन"   
लोणीकरांच्या वक्तव्यावर वडेट्टीवार संतापले  बबनराव लोणीकर यांचे वक्तव्य म्हणजे शेतकऱ्यांचा अपमान आहे