शेतकऱ्यांना शपथपत्रासाठी१०० रूपयाच्या स्टॅम्पपेपरची मुभा देण्यात यावी मागणी

शिवसेनेने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले निवेदन

शेतकऱ्यांना शपथपत्रासाठी१०० रूपयाच्या स्टॅम्पपेपरची मुभा देण्यात यावी मागणी

आधुनिक केसरी न्यूज

वरोडा : शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळविताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी शिवसेनेच्या वतीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्यात आले. ज्येष्ठ शिवसैनिक सुधाकर मिलमिले यांनी शिवसेना लोकसभा संघटक मुकेश जिवतोडे यांच्या मार्गदर्शनात त्यांना मुंबई येथे सदर निवेदन सादर केले.

राज्य शासनाच्या योजनेनुसार शेतकऱ्यांना दरवर्षी शेतीसाठी शून्य टक्के व्याजदराने पीक कर्ज पुरवले जाते. परंतु अलीकडेच लागू करण्यात आलेल्या नव्या शासन निर्णयानुसार सामूहिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना शपथपत्र सादर करताना ५०० रुपयाच्या स्टॅम्पपेपरचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे. या निर्णयामुळे लघु व अल्पभूधारक शेतकऱ्यांवर अतिरिक्त आर्थिक बोजा पडत असून अनेक शेतकरी कर्जासाठी अर्ज करण्यास टाळाटाळ करत आहेत.

या पार्श्वभूमीवर निवेदनात शासनाने सदर निर्णयात सुधारणा करून पूर्वीप्रमाणे १०० रूपयाच्या स्टॅम्पपेपरवर शपथपत्र सादर करण्याची मुभा देण्याची मागणी करण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांना पीक कर्ज प्रक्रियेत सुलभता मिळेल आणि आर्थिक भार कमी होईल, असा निवेदनाचा मुख्य हेतू आहे.

शेतकरीहिताच्या दृष्टीने या निर्णयावर पुनर्विचार करून शासनाने तत्काळ सकारात्मक भूमिका घेण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

संतापजनक प्रवेशोत्सवाच्या दिवशी विद्यार्थ्यांच्या हातात झाडू  संतापजनक प्रवेशोत्सवाच्या दिवशी विद्यार्थ्यांच्या हातात झाडू 
आधुनिक केसरी न्यूज देऊळगाव राजा : शाळेच्या पहिल्या दिवशी सर्वत्र शाळा प्रवेशोत्सव साजरा केला जात असताना तालुक्यातील शिनगाव जहागीर जिल्हा...
जनजाती गौरव वर्ष उपक्रमांमध्ये युवक-युवतींचा सक्रीय सहभाग आवश्यक : मंत्री डॉ. अशोक वुईके
शेतकऱ्यांना शपथपत्रासाठी१०० रूपयाच्या स्टॅम्पपेपरची मुभा देण्यात यावी मागणी
यंत्रणा अलर्ट मोडवर ठेवा : सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांचे निर्देश
काँग्रेसच्या शहराध्यक्षांचा राजीनामा..!
आ.श्री.सुधीर मुनगंटीवार यांचा वीज वितरण कंपनीला इशारा
महारुद्र विकास पॅनल चा दणदणीत विजय..!